कोल्हापूर

गडहिंग्लजला शिवसंवाद यात्रा यशस्वीतेचा निर्धार

CD

गडहिंग्लजला शिवसंवाद
यात्रा यशस्वीतेचा निर्धार
शिवसेना ठाकरेगटाची बैठक; संजय राऊत, चतुर्वेदींचा उद्या दौरा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : जिंकण्यासाठी लढायचं यासाठी येथे बुधवारी (ता. १) सूर्या हॉलमध्ये होणाऱ्या शिवसंवाद कार्यक्रमासाठी ठाकरे खासदार संजय राऊत, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह आमदार व पदाधिकाऱ्यांचा दौरा आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेना ठाकरेगटाचे नेते रियाज शमनजी, तालुकाप्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख संतोष चिकोडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
शमनजी म्हणाले, ‘‘सत्ता व पैशाच्या लालसेपोटी काही आमदार शिवसेना सोडून गेले व भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्तेचा गैरवापर करून पक्षाचे नाव व चिन्ह काढून घेतले. आता पुन्हा नव्याने पक्षसंघटना उभारणीचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी लढायचं म्हणून शिवसंवाद यात्रा आयोजित केले आहे. त्यासाठी राऊत, चतुर्वेदी यांच्यासह आमदार बाबूराव माने, प्रवक्ते लक्ष्मण हाके, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत गडहिंग्लजला शिवसंवाद यात्रा होणार आहे. त्यासाठी बाळासाहेब, उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारी जनता, शिवसैनिकांनी हजेरी लावून हा दौरा यशस्वी करावा.’’
चिकोडे म्हणाले, ‘‘शिवसेना नाव व चिन्ह दोन्हीही गेले असले तरी ज्या-ज्या वेळी शिवसेनेवर आघात होतो तेंव्हा शिवसेना पुन्हा ताकदीने मैदानात उतरते. यामुळे जिंकणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही असा आदेश उद्धव ठाकरेंचा आहे. म्हणून ही यात्रा होत आहे.’’ दिलीप माने यांनी या शिवसंवादसाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, कागल विभागातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले. निकृष्‍ट राजकारणाला छेद देण्यासाठीच शिवसंवाद यात्रा सुरू असल्याचे ते म्हणाले. या वेळी युवा सेनेचे प्रतीक क्षीरसागर, संदीप कुराडे, सुलोचना रेडेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT