कोल्हापूर

ए.एस.ट्रेडर्स -सरकारी वकील युक्तीवाद

CD

ए. एस. ट्रेडर्सचा इतर कंपन्यांशी संबंध
---
सरकारी वकिलांकडून खाते उतारा सादर
कोल्हापूर, ता. २७ ः ए. एस. ट्रेडर्सचा इतर कंपन्यांशी संबंध असल्याचा खाते उतारा आज सरकारी वकील अल्ताफ पिरजादे यांनी न्यायालयात सादर केला. त्यामुळे ए. एस. ट्रेडर्सचे लोहितसिंह सुभेदार यांच्यासह इतरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी ॲड. पिरजादे यांनी केली. यावर पुढील तारीख ४ मार्च असून, त्या दिवशी अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे ॲड. पिरजादे यांनी सांगितले. जिल्हा न्यायाधीश (वर्ग ४) एस. पी. गोंधळेकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे.
ए. एस. ट्रेडर्सच्या अन्य सहा कंपन्यांकडून ए. एस. ट्रेडर्सला पैसे दिल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले. यात संबंधित कंपन्यांनी काही पैसे दिल्याच्या नोंदी असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणले. ‘एमपीआयडी’ कायद्यानुसार पैसे वसूल करण्याची आणि गुंतवणूकदारांना देण्याची तरतूद आहे. त्यामुळे संबंधित संशयित आरोपींची मालमत्ता कोठे आहे, त्यांनी कोठे गुंतवणूक केली आहे यासह अन्य तपास होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी केल्याची माहिती ॲड. पिरजादे यांनी दिली. तसेच, एका संशयित आरोपीला अटक झाली. त्यामुळे त्याचा अर्ज या सुनावणीतून मागे घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Police Transfer: महाराष्ट्र पोलिसांत मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

NEET Paper Leak: ‘नीट’ पेपरफुटीनंतरही सरकार जागे नाही; खासगी क्लासेसवरील कायदा अजूनही रखडला, शिक्षण विभागाकडून केवळ कागदी हालचाली

Pune Water Crisis : पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट ! खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात उरला फक्त ७.५ टीएमसी साठा

Sangli Police Bribery : लाचखोर पोलिसाला एसपी दोशींचा मोठा दणका; न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यासाठी मागितलेली 5 हजारांची लाच, हवालदाराला कसं रंगेहाथ पकडलं?

CSK: चेन्नई सुपर किंग्स IPL 2026 च्या प्ले ऑफमध्ये का नाही पोहोचली? दिग्गज खेळाडूने सांगितली ४ मोठ कारणं

SCROLL FOR NEXT