कोल्हापूर

तृणधान्य पाक कला स्पर्धेस गडहिंग्लज येथे प्रतिसाद

CD

85801
गडहिंग्लज : कृषी विभाग व मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित तृणधान्यापासून पाक कला स्पर्धेत विविध पदार्थांसह महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

तृणधान्य पाक कला स्पर्धेस
गडहिंग्लज येथे प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त विविध तृणधान्यापासून बनवण्यात आलेल्या पाक कलेच्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. शासनाचा कृषी विभाग, मराठी विज्ञान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या. उपविभज्ञगीय कृषी अधिकारी सतीश रोकडे अध्यक्षस्थानी होते.
बाजरी, ज्वारी, नाचणा, राळा आदी तृणधान्यापासून विविध पौष्टीक पदार्थ महिलांनी तयार करुन स्पर्धेत सादर केले होते. नाचणीपासून मोदक, वडे, लाडू, आंबोळी, ढोकळा आदी पदार्थ बनविले होते. श्री. रोकडे यांनी कुटूंबाचे आरोग्य महिलांच्या हातामध्ये असून प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेमधून महिला गटाच्या माध्यमातून व्यावसायिक स्वरुपात या पदार्थांचे रुपांतर करण्याचे आवाहन केले. आहार तज्ञ डॉ. नलिनी सुलतानपुरे यांनी तृणधान्यातील पोषण घटकांची माहिती दिली. उज्ज्वला दळवी व डॉ. सुलतानपुरे यांनी परीक्षण केले.
विज्ञान परीषदेचे कार्यवाह डॉ. एस. के. नेर्ले यांनी स्वागत केले. डॉ. एन. डी. सावंत यांनी आभार मानले. तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, मंडल कृषी अधिकारी रंजना देशमुख, हरिदास बोंगे, पर्यवेक्षक अरुण खोत, आनंद पाथरवट, हरिश्‍चंद्र सिताप, विश्‍वनाथ धूप, बसाप्पा आरबोळे, घाटगे, राजाराम आजगेकर, कृषी सहायक अनिल कांबळे, सचिन नाईक, किशोर धोंडगे, नंदकुमार धनगहू, अविनाश यादव, सुरेखा शिंदे, विद्या मांगले, स्नेहल पाटील, दिपाली कुंभार, पल्लवी कोकीतकर यांनी नियोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT