कोल्हापूर

छायाचित्रकारांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

CD

‘विविधरंगी कोल्हापूर’ स्पर्धेसाठी
छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन
---

कोल्हापूर, ता. १ ः पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याची जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळे व पर्यटनविषयक बाबींवर आधारित ‘विविधरंगी कोल्हापूर..!’ खुली छायाचित्र स्पर्धा घेण्यात येणार आहे.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, निवड होणाऱ्या छायाचित्रांचा समावेश जिल्ह्याच्या कॉफी टेबल बुकमध्ये छायाचित्रकारांच्या नावासह करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठविण्याची अंतिम मुदत १३ मार्च रात्री बारापर्यंत राहील. स्पर्धेची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर https://kolhapur.gov.in/en/notice/vividharangi-kolhapur-photography-competition-२०२३/ येथे उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याची पर्यटनविषयक आकर्षक छायाचित्रे जगासमोर यावीत व जगभरातील पर्यटकांनी कोल्हापूरला भेट द्यावी, यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
अंतिम निवड करण्यात आलेल्या प्रत्येक छायाचित्रासाठी तीन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे; तर सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांना प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक २१ हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १५ हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल, असेही श्री. रेखावार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT