कोल्हापूर

विशाळगड रक्षणसमिती

CD

गडसंवर्धनविषयक मुंबईत उद्या महामोर्चा
कोल्हापूर , ता. १ ःगडदुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण करण्यासाठी अतिक्रमण रोखावे यासह विविध मागण्यांसाठी गडदुर्ग महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी शुक्रवारी (ता.३) गडदुर्ग रक्षण महामोर्चा निघणार आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमा येथून दुपारी बारा वाजता सुरू होऊन आझाद मैदानावर जाईल. राज्यभरातील गडदुर्ग प्रेमी संघटना यात सहभागी होतील, अशी माहिती विशाळगड संरक्षण व अतिक्रमणविरोधी कृती समितीचे किशोर घाटगे, मधुकर नाझरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३५ गडकोटांवर अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणे हटवून गडांचे संवर्धन करावे त्यासाठी गड, दुर्ग महामंडळ स्थापन करावे, अशा मागणीसाठी मोर्चा आहे. किल्ले रायगड, विशाळगड, प्रतापगड, कुलाबा, लोहगड, वंदनगड आदी ठिकाणी अतिक्रमणे झाली. काही किल्ल्‍यातील मंदिरे, समाधी जीर्णावस्थेत आहेत. स्थळांचे सुशोभीकरण व्हावे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्यांचे २५ हून अधिक वंशज, संप्रादाय, हिंदूत्ववादी संघटना, धर्मप्रेमी उपस्थित राहतील. महामोर्चा जागृतीसाठी बैठका, व्याख्याने, संपर्क दौरे सुरू आहेत, असेही घाटगे यांनी सांगितले. यावेळी किरण दुसे, शिवानंद स्वामी, प्रमोद सावंत उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT