कोल्हापूर

राज्य उत्‍पादन छापा

CD

86482

बनावट विदेशी मद्याची तस्करी
करताना किणीत एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ः किणी (ता. हातकणंगले) येथे पुठ्यांच्या बॉक्समध्ये बनावट विदेशी मद्याची तस्करी करताना एकास अटक केली. दिनेश जेकनराम कुमार (वय ३० रा. कावोकी बेरी, रोहिला, ता. धोरीमन्ना गुडा मलानी, जि. बाडमेर राज्य राजस्थान) याला अटक केली. त्याच्याकडून ३५ लाख ५३ हजार दोनशे रुपयांचे मद्य आणि कंटेनर असा सुमारे ४६ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, कागदी पुठ्ठ्यांच्या बॉक्समधून विदेशी मद्याची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे-बंगळूर महामार्गालय किणी तेथे छापा टाकला. अवैध मद्याची वाहतूक करीत असताना सहाचाकी कंटेनरमध्ये कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये बनावट विदेशी मद्य असल्‍याचे दिसून आले. यामध्ये आईस मॅजिक ग्रीन अॅपल ७५० मिलीच्या एकूण ३ हजार २४० सिलबंद काचेच्या बाटल्या व १८० मिलीच्या एकूण ६ हजार २४० सिलबंद काचेच्या बाटल्या असे एकूण ४०० बॉक्स वाहतूक करीत असताना मिळून आले. एकूण ४६ लाख ५३ हजार २०० रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT