कोल्हापूर

गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकास मंजुरी

CD

गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकास मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : येथील नगरपरिषदेचा महसूली व भांडवली ५१ लाखाचा शिलकी अंदाजपत्रक मंजूर केला आहे. अंतिम मंजूरीसाठी हा अंदाजपत्रक जिल्हाधिकाऱ्‍यांना सादर केल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरुप खारगे व लेखापाल प्रविण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एकूण ५३ कोटींच्या अर्थसंकल्पात नाट्यगृह, नवीन अग्निशमन वाहन, त्याचे साहित्य, पाणी योजना, सौर प्रकल्प, शिक्षण, कला, क्रीडा, महिला बालकल्याण, रस्ते, गटारी, दिव्यांग कल्याण निधी, प्रसाधनगृहे, पथदिवे, इमारती दुरुस्ती आदीसाठी विशेष तरतुदी अर्थसंकल्पात केल्याचेही ते म्हणाले. पालिकेच्या तिजोरीत १९ कोटी ११ लाख ४१ हजार महसूल जमा होणार असून त्यातील १९ कोटी ६ लाख ६६ हजार रुपये खर्च होणार आहेत. ४ लाख ७५ हजार शिल्लक राहणार आहेत. ३४ कोटी ५७ लाख ४९ हजार भांडवली जमा होणार असून त्यातून विविध योजना, पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ३४ कोटी १० लाख ५३ हजाराची तरतूद केली आहे. निवडणुकीसाठी ५५ लाखाची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले. राखीव निधीसाठीही ५७ लाखाची तरतूद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT