कोल्हापूर

कष्टाला बुद्धिमत्तेची जोड देवून उद्योग वाढवा

CD

86706

कष्टाला बुद्धिमत्तेची जोड देवून
उद्योग वाढवा ःगिरीश चितळे

बिझेनस आयडिया’ पुरस्कारांचे वितरण

कोल्हापूर, ता. ३ ः कष्टाला बुद्धिमतेची जोड देत प्रामाणिकपणे कार्यरत राहून उद्योग वाढवा. आरोग्य, उद्योग, संपदेच्या सुरक्षिततेसाठी विमा कवच घ्या, असे आवाहन बी. जी. चितळे ग्रुपचे भागीदार गिरीश चितळे यांनी आज येथे केले.
भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (बीवायएसटी) कोल्हापूर आणि एचडीएफसी बँक परिवर्तनतर्फे आयोजित बिझनेस आयडिया स्पर्धेतील पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. रोटरी समाज सेवा केंद्रातील या कार्यक्रमास औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहसंचालक सुरेश जोशी, युनियन बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख रामानंद टी. व्ही. प्रमुख उपस्थित होते.
रामानंद टी. व्ही. यांनी उद्योगातील मनी, मॅनेजमेंट, मार्केटिंगचे महत्त्व सांगितले. विजयालक्ष्मी दास पुरस्कार मिळाल्याबद्दल सांगलीतील उद्योजिका स्वप्नाली सातपुते यांचा सत्कार झाला. डॉ. ए. एम. गुरव, विदुला वास्कर, भाग्यश्री पंडित, अमरनाथ कुलकर्णी, जगदीश पाटील, देवेंद्र दिवाण, विश्‍वनाथ पवार उपस्थित होते. ‘बीवायएसटी’ कोल्हापूरच्या अध्यक्षा पल्लवी कोरगावकर यांनी स्वागत केले. जोशी यांनी उद्योग सुरक्षा आणि आरोग्य याविषयावर मार्गदर्शन केले. राकेश कदम यांनी स्पर्धेची आणि सीए नरेंद्र जोशी यांनी परीक्षणाची माहिती दिली. सीमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. शिंपुकडे उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळकृष्ण शिंपुकडे यांनी आभार मानले.

चौकट
पुरस्कार विजेते असे
या बिझनेस आयडिया स्पर्धेत मनाली थारवाल हिने ईडेबल वॉटरबॉलची संकल्पना मांडत प्रथम क्रमांक पटकविला. प्राजक्ता चौगुले हिने स्मार्ट जीएसएम प्रणाली सादर करत द्वीतीय, तर मिनेश राजपूत याने प्लॅस्टिक वेस्टपासून इंधननिर्मिती मांडत तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना बिझनेस आयडिया पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT