कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेसाठी आज मतदान

CD

शिवाजी विद्यापीठ कर्मचारी
पतसंस्थेसाठी आज मतदान

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सन २०२३-२०२८ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, शनिवारी (ता. ४) मतदान होणार आहे. या पतसंस्थेतील संचालकांच्या १५ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ३६ उमेदवार आहेत. एकूण ४३२ सभासद असलेल्या या पतसंस्थेच्या १५ संचालकांसाठी निवडणूक होत आहे. त्यात सर्वसाधारण गटात १०, एसटी-एससी आणि व्हीजेएनटी, ओबीसी प्रत्येकी १ तर महिला प्रतिनिधी दोन जागा आहेत. त्यासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३६ उमेदवार उतरले आहेत. ते सर्वजण अपक्ष लढत आहेत. विद्यापीठातील गणित अधिविभागात शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत मतदान होईल. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, गेल्या वीस दिवसांपासून या ३६ उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठ कॅम्पस निवडणूकमय झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT