कोल्हापूर

बहुजन समाजातील तरुणांनी स्वावलंबी व्हावे

CD

gad57.jpg
87013
अत्याळ : समरजित घाटगे यांच्याहस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप झाले. प्रकाश पाटील, बचाराम मोहिते, प्रताप मोहिते, अजित जामदार आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------
बहुजन समाजातील
तरुणांनी स्वावलंबी व्हावे
समरजित घाटगे : अत्याळला बांधकाम कामगारांना सुरक्षा किट
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थीपर्यंत पोहचवण्यासाठी गट तट न पाहता मी व कार्यकर्ते अविरत आपल्यासोबत आहे. बहुजन समाजातील तरुणांनी व्यवसायाद्वारे स्वत:च्या पायावर उभे रहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे १०२ बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप, शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक व खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश पाटील अध्यक्षस्थानी होते. श्री. घाटगे म्हणाले, ‘एकाच रस्त्यावर नारळ वाढवत उद्‍घटनाचे कार्यक्रम घेवून लोकांच्या डोळ्यावर पट्टी न बांधता विकासाच्या राजकारणावरच मते मागण्यासाठी येणार आहे.’ बचाराम मोहिते म्हणाले, ‘अभ्यास, दुरदृष्टी, विकासाचा दृष्टीकोनातून सर्व योजना तळागाळात पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न समरजित घाटगे करीत आहेत.’
रामचंद्र शिंदे यांनी स्वागत केले. अजित जामदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच संजीवनी माने, गोडसाखर संचालक कविता पाटील, उपसरपंच अनिता घोरपडे, प्रताप मोहिते, माधुरी मोहिते, अंजना पाटील, बबन पाटील, शामराव गाडीवडर, पांडूरंग गाडीवड्ड, संजय मळगेकर, वसंत कांबळे आदी उपस्थित होते. रामदास मोहिते यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT