कोल्हापूर

आज होळी

CD

रविवारपर्यंत रंगणार
पर्यावरणपूरक आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : पर्यावरणपूरक होळीची परंपरा यंदाही कोल्हापूरकर अधिक व्यापक स्वरूपात जपणार आहेत. विविध कृती कार्यक्रमावर भर दिला जाणार आहे. उद्या, सोमवारी (ता. ६) होळीचा सण असून, रंगपंचमीपर्यंत हा आनंदउत्सव साजरा होणार आहे. दरम्यान, ‘‘सर्वांनी एकत्र येऊन वाईट प्रवृत्तीची प्रतीकात्मक होळी करूया. प्रत्येक सण पर्यावरणपूरक साजरा करूया,’’ असे आवाहनही विविध संस्थांनी केले.
होळीची पोळी गरजूंना देण्याची परंपराही जपणार आहे. उद्या (ता. ६) सकाळपासूनच पोळ्या संकलित केल्या जाणार आहेत. संकलित पोळ्या ऊसतोड मजूरासह वीट भट्टी कामगारांना वितरित केल्या जाणार आहेत.
रंगपंचमीनिमित्त कोरड्या व नैसर्गीक रंगाचा वापर अधिक होणार आहे. रंग बाजारात उपलब्ध आहेत. निसर्ग मित्र आणि आदर्श सहेली मंचच्या उपक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल पाच हजार कुटुंबामध्ये स्वयंनिर्मित वनस्पतीजन्य रंगांचा वापर होणार आहे. होळीसाठी वापरल्या जाणाऱ्या एरंड या वनस्पतीच्या आरोग्यदायी उपयोगाबाबतही प्रबोधन होणार आहे.


होळीची पोळी अंध मुलांसाठी
फाईट अगेन्स थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनतर्फे होळीनिमित्त होळीची पोळी अंध मुलांसाठी हा उपक्रम होणार आहे. या मुलांसोबत होळी साजरी करताना हौशी गायकांचा स्वराभिषेकही होणार आहे. शिवाजी पेठ सरनाईक कॉलनीतील आदर्श प्रशाला येथे सकाळी दहा वाजता हा उपक्रम होईल. होळीच्या नैवेद्याची पोळी आगीत राख करून टाकण्यापेक्षा त्यानेच दुःखीतांचे तोंड गोड करूया.. पुरणपोळ्या देण्याच्या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा, असे आवाहन ऑर्गनायझेशनने केले आहे.

सामुदायिक रंगपंचमीवर भर
रंगाचा बेरंग होऊ नये, यासाठी पाण्याचा कमीत कमी वापर करण्याबरोबरच सामुदायिक रंगपंचमीवरही यंदा विविध संस्था संघटनांनी भर दिला आहे. कोरड्या रंगाचा वापर आणि बंदिस्त हॉलमध्ये रंगपंचमी साजरी होईल.

बालचमूंचा उत्साह
होळी रे होळी, पुरणाची पोळी म्हणत आज होलिकादहन होणार आहे. बालचमूसाठी चामड्याच्या टिमकीसोबत, ढोलच्या खरेदीसाठी रविवारी महापालिका, बाजारगेट परिसरात बाजारपेठ फुलली होती.

शेणी दान करा
होळीच्या निमित्ताने यंदाही शेणी दानावरही भर दिला जाणार असून, महापालिकेने केलेल्या आवाहनाला शहरातील विविध संस्था, संघटना आणि तालीम मंडळांनी त्याला सक्रिय प्रतिसाद दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT