कोल्हापूर

गुन्हेगारी वृत्त

CD

उसनवारीतून तरुणाला मारहाण
कोल्हापूर : उसने पैसे परत देण्याच्या कारणातून बालिंगा येथे तरुणाला मारहाण करण्यात आली. याबाबतची फिर्याद योगेश भाऊसो सूर्यवंशी (वय ३४, रा. फुलेवाडी) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संग्राम वरेकर, सुनील वरेकर, सागर वरेकर (सर्व रा. फुलेवाडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश यांनी सुनील वरेकर यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. या व्यवहाराच्या वादातून सुनील आणि सागर यांनी बालिंगा येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. या वेळी तिघांनी योगेश यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात काचेची सोड्याची बाटली फोडली. याबाबतचा गुन्हा करवीर पोलिस ठाण्यात दाखल केरण्यात आला आहे.
----------

विविध ठिकाणी झालेल्या चोऱ्यांत
दुचाकीसह सायकल, मोबाईलची चोरी

कोल्हापूर ः शहरात विविध ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये दुचाकी, सायकल आणि मोबाईल फोन चोरी करण्याची घटना घडली. याची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंकाळा येथील जॉकी बिल्‍डिंगसमोर लावलेली दुचाकी शुक्रवारी (ता. ३) अज्ञाताने चोरून नेली. याबाबतची फिर्याद रोहित तानाजी भालेकर (वय २३, रा. सांगवडे, ता. करवीर) यांनी दिली. दुसरी घटना मुक्तसैनिक वसाहत येथे घडली. येथील १२ हजार रुपयांची सायकल चोरून नेण्यात आली. याबाबतची फिर्याद अविनाश मेघानी (वय ३४, रा. मुक्तसैनिक वसाहत) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट जवळून मोबाईल चोरी होण्याची घटना नुकतीच घडली. देवांशी दिग्विजय मोरे (वय ३१, रा. दुधाळी परिसर) हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पाणी पित होते. या वेळी त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला असता, तो काही वेळात गायब झाला. याबाबतची फिर्याद त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
--------
शिंगणापुरात एकाची आत्महत्या

कोल्हापूर ः शिंगणापूर येथील सुरेश शंकर कांबळे (वय ५५) यांनी आत्महत्या केली. त्यांनी राहत्या घरी तुळईला दोरीने गळफास घेतला. करवीर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. कांबळे यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

SCROLL FOR NEXT