कोल्हापूर

सम्राटनगर येथील जिव्हेश्वर सांस्कृतिक भवनचे उत्साहात उद्घाटन

CD

87555

सम्राटनगर येथील जिव्हेश्वर
सांस्कृतिक भवनचे उद्‍घाटन

कोल्हापूर, ता. १२ ः सम्राटनगर येथील स्वकुळ साळी समाज संस्थेने नूतनीकरण केलेल्या श्री जिव्हेश्वर सांस्कृतिक भवनचे उद्‍घाटन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्य सभागृहाचे कै. सरस्वती तुकाराम दुधाने सभागृह असे नामकरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्वकुळ साळी समाज कोल्हापूरचे अध्यक्ष उदय दुधाणे होते.
आमदार जाधव म्हणाल्या, ‘‘मी राहत असलेल्या भागातच हे जिव्हेश्वर सभागृह नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीने समाजबांधवांनी उभे केले आहे. या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमातून एकीचा संदेश निश्चितपणे समाजात जाईल.’ उदय दुधाणे म्हणाले, ‘‘दहा हजार चौरस फूट जागेत अद्ययावत सुविधांसह सांस्कृतिक भवन साकारले आहे.’’ या कार्यक्रमात सांस्कृतिक भवनच्या बांधकामासाठीचे देणगीदार वसुंधरा शेंद्रे, विश्वनाथ शेंद्रे, तुकाराम दुधाणे, वसंतराव काजवे, शंकरराव दैव, अभय बिचकर, दीपाली दुर्गुळे, प्रशांत पांढरपट्टे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अशोक रोकडे, प्रकाश भंडारे, दिलीप घट्टे, सुरेश बडवे, बाळासाहेब पैठणकर, गणेश महाजन, आशा महाजन, विलास मुदगल, संतोष बेलेकर उपस्थित होते. वंदना दुधाणे, सुमन घट्टे, ज्योती दुधाणे, अनिता पागडे यांनी स्वागत केले. धोंडिराम पागडे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT