कोल्हापूर

गोबल रूबेला

CD

१६, ५६४ मुलांचे
‘गोवर रूबेला’चे
नियमित लसीकरण

कोल्हापूर, ता. ८ ः शहरामध्ये गोवर रूबेला लसीकरणाच्या दोन मोहिमांचे टप्पे राबवण्यात आले. त्यानंतरही वंचित राहिलेल्या मुलांसाठी १० मार्चपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजतागायत या मोहिमांमधून वंचित राहिलेल्या २१४ मुलांना दोन डोस देण्यात आले. नियमित लसीकरणातून जानेवारीअखेरपर्यंत शहरातील विविध केंद्रांवर १६ हजार ५६४ मुलांना डोस देण्यात आले.
लहान मुलांना नियमित लसीकरणातून गोवर रूबेलाचे डोस दिले जातात. महापालिकेच्या दवाखान्यात मुलांच्या नियमित लसीकरणासाठी शहरातील तसेच परिसरातील पालक येतात. नियमित लसीकरणाला प्रतिसाद चांगला असतो. त्यातून पहिला डोस ८०४४ मुलांना, तर दुसरा डोस ८५२० मुलांना देण्यात आला. तरीही ऊसतोड कामगार, वीटभट्टी, बांधकाम कन्स्ट्रक्शन, स्थलांतरित कुटुंबांतील मुलांचे लसीकरण राहण्याची शक्यता असते. तसेच इतर ठिकाणी गोवर रूबेलाचा उद्रेक झाल्याने शासन आदेशानुसार डिसेंबर, जानेवारी अशा दोन महिन्यांत महापालिकेने मोहीम राबवली. आता दहा मार्चपर्यंत तिसरी मोहीम हाती घेतली आहे. त्यात ५६ मुलांचे उद्दिष्ट आहे. या तीनही मोहिमांमधून पहिला डोस ९२ मुलांना, तर दुसरा डोस १२२ मुलांना दिला आहे.
उष्ण व थंड वातावरणाने सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव म्हणाले, ‘‘यापूर्वी कोरोनात मास्क तसेच एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याच्या नियमांची अंमलबजावणी करत होतो. तसेच नागरिकांनी स्वतःहून हे नियम पाळले तर कुटुंबीयांबरोबरच संपर्कात येणाऱ्या इतरांना संसर्ग कमी होईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT