कोल्हापूर

मनपा प्रशासक

CD

दिवाळीत निवडणुकीची शक्यता
कोल्हापूर, ता. ८ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे महापालिका निवडणुकीतील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. यावेळी काही निर्णय न होता सुनावणी लांबणीवर गेली तर निवडणूक पावसाळ्यानंतर दिवाळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समित्यांवरील प्रशासकांचा कालावधी आणखी काही वाढवला जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपून दोन वर्षे होऊन गेली आहेत. प्रशासकांचा कालावधी यापूर्वी वाढवण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रभाग रचनेवरून सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी १७ मार्चला होणार आहे. त्यादिवशी सुनावणी झाल्यास त्यात न्यायालय काय आदेश देते की आणखी पुढील तारीख पडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. जरी या महिन्याच्या अखेरीस निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली तर किमान तीन महिने लागणार आहेत. त्यात पावसाळा सुरू होणार असल्याने निवडणूक त्यानंतरच घेतली जाऊ शकते, असे सूत्रांचे मत आहे. त्यामुळे दिवाळीच्या दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT