कोल्हापूर

भीती नको खबरदारी आवश्यक

CD

भीती नको खबरदारी आवश्यक
इचलकरंजीतील आयजीएममध्ये १ मार्चपासून ८ कोरोना रुग्ण
इचलकरंजी, ता. १० : इचलकरंजी शहरात खंडित झालेला कोरोना संसर्ग पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. शहरातील आयजीएम रुग्णालयात १ मार्चपासून ८ कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यामधील एका महीलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिघांना घरी विलगिकरण करण्यात आले आहे. अद्याप चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या दोन लाटानंतर नागरिकांमधून संसर्गाबाबत असणारी सतर्कता कमी झाली आहे. परिणामी सुरक्षा साधनांचा वापरही कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाबाबत भीती न बाळगता खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.
इचलकरंजीने कोरोनाचा कहर सोसला आहे. पुन्हा तशी वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे. सध्या शहरात आढळून आलेली संक्रमित रुग्णांची संख्या कमी असली तरी दक्षता पाळावी लागणार आहे. कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने आयजीएम रुग्णालयाने कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने अतिदक्षता विभागातील ४ बेड, ऑक्सिजनचे २८ बेड, तर २० सामान्य बेडसोबत आवश्यक औषधांचे सज्ज ठेवले आहे. आवश्यकता भासल्यास आणखी बेड उपलब्ध करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
----------
वातावरण बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासन सतर्क असून योग्य उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी.
सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT