कोल्हापूर

संपातील कर्मचारी संख्या वाढली

CD

जिल्‍हा परिषद ...
...

संपातील कर्मचारी संख्या वाढली

कोल्‍हापूर, ता.१५: जुनी पेन्‍शन योजना लागू करावी, यासाठी सुरु असलेल्या कर्मचारी संपातून शिक्षक संघाने माघार घेतली. अशा फुटीचा संपावर परिणाम होवू नये म्‍हणून आज कर्मचारी संघटना अधिक आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या. जिल्‍हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यां‍नी एकत्र येत शासनाच्या आदेशाची होळी केली. तसेच चोरुन अधिकाऱ्यां‍च्या मदतीला धावणाऱ्या, कमिशनची कामे करण्यासाठी धावाधाव करणाऱ्यां‍ची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. तसेच ज्या शिक्षकांनी पहिल्या दिवशी कामावर हजेरी लावली, त्यातील अनेक कर्मचाऱ्यां‍ना दुसऱ्या‍ दिवशीच्या आंदोलनात सहभागी करुन घेण्यात संघटनांना यश आले.

जिल्‍हा परिषदेच्या संपात पहिल्या दिवशी ७ हजार १२५ कर्मचाऱ्यां‍नी सहभाग नोंदवला. तर संघटनेने दुसऱ्या‍ दिवशी कडक भूमिका घेतल्याने संपावर जाणाऱ्या‍ कर्मचाऱ्यां‍ची संख्या दुसऱ्या‍ दिवशी ७ हजार ३११ इतकी झाली आहे. मंगळवारी संप करणाऱ्या‍ कर्मचाऱ्यां‍ची संख्या १८६ इतकी वाढली आहे. तरीही संपात सहभागी न होता कामावर हजर राहिलेल्या कर्मचाऱ्यां‍ची संख्या ३ हजार २४४ इतकी आहे. दरम्यान, राजपत्रित संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने आज जिल्‍हा परिषदेच्या खाते प्रमुखांनी आंदोलकांची भेट घेवून, सोबत असल्याचे स्‍पष्‍ट केले. राजपत्रित अधिकारी संघटनेनेही २८ मार्चनंतर या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या शासकीय कार्यालयात जी काही हालचाल सुरु आहे, ती या अधिकाऱ्यां‍मुळे दिसत आहे. जर हे अधिकारी आंदोलनात सहभागी झाले तर मात्र परिस्‍थिती अधिकच चिघळण्याची चिन्‍हे आहेत. अधिकारी संपावर गेले तर शासकीय कार्यालयीन कामकाज कोलमडून जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

Numerology : कुटुंबासाठी काहीही करू शकतात 'या' 4 मुलांकाचे लोक, कुणी अपमान केल्यास बदला घेण्यासाठी करतात हद्द पार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT