कोल्हापूर

सकाळच्या सत्रातील शाळा सुरू

CD

शिक्षकांच्या संपातही
‘झेडपी’च्या १०३३ शाळा सुरू

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार; शहरातील शाळा बंदच


कोल्हापूर, ता. १५ ः जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षक बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. जे शिक्षक, कर्मचारी या संपात सहभागी झाले नाहीत, त्यांच्या शाळा सकाळच्या सत्रात आजपासून सुरू झाल्या. त्यामध्ये ग्रामीण भागातील बहुतांश शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण १९७३ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी १०३३ शाळा आज सुरू,तर ९४० शाळा बंद राहिल्या.
मार्च ते मे महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा अधिक प्रमाणात जाणवतो. त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होवू नये या उद्देशाने दरवर्षी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात येते. त्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सूचनेनुसार कार्यवाही करत आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात आल्या. सकाळी ७ ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटे अशी शाळांची वेळ आहे. उन्हाळी सुटी सुरू होईपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा भरणार आहेत. शिक्षकांच्या संपामुळे ९४० शाळा बंद असून त्यातील अधिकतर शाळा चंदगड, भुदरगड, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यातील आहेत. खासगी, स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील इंग्रजी माध्यमाच्या शाळा नियमितपणे सुरू आहेत.
शहरातील बहुतांश शाळांतील शिक्षक, कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने महानगरपालिका, शासकीय अनुदानित तत्वावरील शाळा बंदच आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात आज इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या नियमकांची बैठक होती. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जुनी पेन्शनसाठीच्या बेमुदत संपामध्ये सहभागी झालो आहोत. त्यासह बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत राज्यव्यापी संप मिटत नाही. तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीचे काम करणार नाही, असे निवेदन मुख्य नियामक, सर्व नियामक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव डी. एस. पोवार यांना दिले. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब बागडी, उपाध्यक्ष विजय मेटकरी, सहसचिव विठ्ठल नाईक, मुख्य नियामक अशोक राजोबा, वनिता पवार, रोहिणी बडवे, छाया खंडाईत, प्रमिला डोणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT