कोल्हापूर

हरळी खुर्दला पाणी पेटले

CD

gad1710.jpg
89750
हरळी खुर्द : जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी योजनेच्या कामाचा गावातील भाजपच्या दोन्ही गटाकडून प्रारंभ करण्यात आला.
-----------------------------------------------------
हरळी खुर्दला पाणी पेटले
योजना एक, प्रारंभ दोनदा : भाजपच्या दोन गटात रंगला श्रेयवाद
गणेश बुरुड : सकाळ वृत्तसेवा
महागाव, ता. १७ : हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथे जलजीवन मिशन योजनेतंर्गत मंजूर झालेल्या पाणी योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला. विशेष म्हणजे योजना एक आणि कामाचा प्रारंभ दोनवेळा केला आहे. यामुळे भाजपच्या दोन गटात योजनेचा श्रेयवाद घेण्याचा मुद्दा रंगला आहे. या राजकीय वातावरणामुळे गावातील पाणी पेटल्याचे चित्र आहे.
डिसेंबरमधील निवडणुकीत ग्रामपंचायतीत सत्तांतर होवून आजी-माजी सैनिक संघटनेचे पॅनेल सत्तेवर आले. निवडणुकीनंतर नूतन सरपंच, उपसरपंचासह सहा सदस्यांनी भाजप प्रवेश केला आहे. तत्पूर्वी उर्मिला पाटील लोकनियुक्त सरपंच होत्या. त्याही भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. यामुळे गावात भाजपचे दोन गट सक्रीय झाले आहेत.
दरम्यान, गावासाठी एक कोटी ३९ लाखाची जलजीवन मिशन पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेच्या कामाच्या प्रारंभाचे दोन्ही गटांकडून नियोजन झाले. गुरुवारी (ता. १६) माजी सरपंच उर्मिला पाटील यांच्या पुढाकाराने कार्यक्रम झाला. गोडसाखचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्याहस्ते या कामाचा प्रारंभ झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, रवींद्र शेंडुरे, दत्तात्रय नाईक, सिताराम पाटील, सविता नाईक, विश्वजीत पाटील, सुषमा कुंभार, संजय रेडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
आज (ता. १७) सकाळी ग्रामपंचायतीच्या सत्तारुढ गटाकडून केलेल्या नियोजनात याच योजनेच्या कामाचा प्रारंभ शिवाजीराव पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी सरपंच साधना आयवाळे, उपसरपंच चंद्रकांत राजे, सोसायटीचे अध्यक्ष शशिकांत चौगुले, सुरेश पाटील, दत्तात्रय आयवाळे, जयसिंग पाटील आदी उपस्थित होते.
------------------
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना आम्ही मंजूर करुन आणली आहे. त्यामुळे योजना कामाच्या प्रारंभाचे नियोजन आम्हीच केले आहे.
- उर्मिला पाटील, माजी सरपंच
----------------------------------
पाणी योजनेच्या कामाच्या प्रारंभाची तारीख ग्रामपंचायतीने जाहीर केली आहे. केवळ श्रेय घेण्यासाठीच दुसऱ्‍या गटाकडून कार्यक्रम घेतला आहे.
- शशिकांत चौगुले, सदस्य ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT