कोल्हापूर

राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या अंतिम सहा संघात ‘शिवाजी विद्यापीठ’

CD

फोटो-89807
.....................
राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या अंतिम
सहा संघांमध्ये शिवाजी विद्यापीठ

संसदीय कार्य मंत्रालयाचे पत्र; डॉ. प्रल्हाद माने यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः सोळाव्या राष्ट्रीय युवा संसदेमध्ये देशभरातील विद्यापीठांमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अंतिम सहा संघांमध्ये शिवाजी विद्यापीठाची निवड झाली आहे. त्याबाबतचे संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव ए. बी. आचार्या यांचे पत्र नुकतेच विद्यापीठाला प्राप्त झाले आहे, अशी माहिती विद्यापीठ युवा संसद स्पर्धेचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी आज दिली.
केंद्र सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत १६ वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा शिवाजी विद्यापीठात २९ एप्रिल २०२२ रोजी झाली. संसदीय कार्य मंत्रालयामार्फत समूह समन्वयक डॉ. एस. पी. सिंग, पाटणा (बिहार) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (लोणेरे) येथील डॉ. एस. बी. देवसरकार यांच्या परीक्षणाखाली आणि कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या संसदीय युवा संसदेमध्ये शपथविधी, श्रद्धांजली, नवीन मंत्र्यांची ओळख, प्रश्नोत्तराचा तास, शून्य प्रहर, विशेषाधिकाराचा भंग, राज्यसभेतील संदेश, आयत्या वेळेचे विषय, बिल (कायदा) पारित करणे, आदी संसदीय कामकाजाचे मुद्दे घेतले होते. वंदना रंगलानी, आशिया जामदार, तेजस सन्मुख, प्रीती पाटील, स्नेहा मगदूम, प्रज्वल माळी, सद्दाम मुजावर, श्रेया म्हापसेकर यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित केले. युवा संसद संघाचे कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
....................
कोट...
संसदीय कार्य मंत्रालयामार्फत देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधून सक्षम नेतृत्व विकसित होते. लोकशाहीची मूल्ये रुजविली जातात. यातून भारतीय संसदेचे कामकाज कसे चालते, याचे आकलन होते. कायदा पास करण्याची प्रक्रिया समजते. शिवाजी विद्यापीठाने या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणे ही अतिशय गौरवाची बाब आहे. देशभरातील सहा संघांतून प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी आपला संघ निश्चित प्रयत्न करेल.
- डॉ. प्रल्हाद माने
.........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT