कोल्हापूर

माजी नगरसेवक संघाचा विजय

CD

लोगो-
महापालिका चषक फुटबॉल स्पर्धा

89962
कोल्हापूर : महापालिका फुटबॉल चषक स्पर्धेतील शनिवारी छत्रपती शाहु स्टेडियमवर प्रदर्शनीय सामन्यात विजयी माजी नगरसेवक संघाला बक्षीस देताना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे.


समाजासाठी झटणारे मैदानात भिडले
प्रदर्शनीय सामन्यात ‘माजी नगरसेवक'' सरस; आज ‘खंडोबा’ विरुद्ध ‘बालगोपाल’ महामुकाबला
कोल्हापूर, ता. १८ : सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच एकमेकाला धारेवर धरत आरोप-प्रत्यारोपात गोधळ माजविणारे, साऱ्यांच्या हालचालीवर करडी व बेकायदेशीर गोष्टीवर नेहमीच नजर ठेवणारे हे चार विभाग शनिवारी एकमेकाशी भिडले, कामानिमित्त नव्हे फुटबॉल मैदानात. निमित्त होते, महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेतील प्रदर्शनीय सामन्याचे. पोलिस, महसूल, पत्रकार, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसह माजी नगरसेवकांचा संघ यांच्यातील सामन्यात प्रत्येक खेळाडूने आपल्या संघाच्यावतीने कर्तुत्वाप्रमाणे खेळाचे जोरप्रर्दशन केले. अखेर साऱ्यावर माजी नगरसेवक संघाने विजय मिळवला.
प्रदर्शनीय पहिला सामना कोल्हापूर पत्रकार संघ विरुद्ध माजी नगरसेवक संघांदरम्यान झाला. सामन्यात नगरसेवक संघाकडून विनायक फाळके यांनी दोन गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. दुसरा प्रदर्शनीय सामना महापालिका अधिकारी-कर्मचारी संघ विरुद्ध पोलिस व महसूल कर्मचारी संघात झाला. अत्यंत चुरशीने झालेल्या सामन्यात महापालिका अधिकारी-कर्मचारी संघाकडून उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी एक, अक्षय सरनाईक यांनी एक गोल नोंदवत २-० अशा गोलफरकाने हा सामना जिंकला. माजी नगरसेवक विरुद्ध महापालिका अधिकारी-कर्मचारी संघांतील अंतिम सामना एक गोल बरोबरीत झाला, अखेर टायब्रेकरवर माजी नगरसेवक संघाने ४-३ गोलफरकाने विजय मिळविला. संघाचा मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरवले. या स्पर्धेचा अंतिम सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ संघांत दुपारी चारला होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT