कोल्हापूर

डीवायपी पॉलिटेक्निक कार्यशाळा

CD

90347
कसबा बावडा : येथील डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये ई टेंडरिंग या विषयावरील कार्यशाळेत बोलताना उपअभियंता धनंजय भोसले. शेजारी प्राचार्य डॉ महादेव नरके, वनिता पाटील, हर्षद बरगे आदी.

अभियंत्यांनी स्वतःला
अपडेट ठेवावे : भोसले
डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये ई-टेंडरिंग कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर गुणवत्ता असणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगामध्ये अभियंत्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाहूवाडी विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले यांनी केले. कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये ‘ई टेंडरिंग'' या विषयावरील एक दिवसोय कार्यशाळेच्या उद्‍घाटनावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने ही कार्यशाळा झाली.
सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे महत्त्वाचे ठरू शकते. त्यासाठी सचोटी, परिश्रमाची तयारी, कामाप्रती समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ.महादेव नरके म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील गोष्टींचे ज्ञान उपलब्ध होण्यासाठी पॉलिटेक्निकतर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निश्चितपणे वाढेल.’’
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या समन्वयक वनिता पाटील यांनीही मार्गदर्शन केले. औरंगाबाद येथील ई टेंडर गुरुचे संस्थापक हर्षद बरगे यांनी ई टेंडर फॉर्मबाबत मार्गदर्शन केले. या वेळी कार्यशाळा समन्वयक प्रा. शिवांगी मालवीया, उपप्राचार्य प्रा.एम.पी.पाटील, सिव्हील विभागप्रमुख प्रा.अक्षय करपे, प्रा. बी. जी. शिंदे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT