कोल्हापूर

गुढीपाडवा बाजारपेठ

CD

बाजारपेठेत खरेदीची गुढी
उद्या खरेदीचा उत्सव; विविध ऑफर्सचा खजिना उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ सज्ज झाली असून, विविध ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या आहेत. खरेदीवर विविध सवलतींबरोबरच वित्तीय सहाय्याच्या आकर्षक योजनांचा त्यामध्ये समावेश असून काही ठिकाणी शून्य टक्के व्याजदरानेही ही सुविधा उपलब्ध केली आहे. दरम्यान, आज रात्री पाऊणेदहानंतर आमावस्या असल्याने गुढी उभारण्यासाठी आवश्यक काठी, वस्त्र, फुले व साखरमाळा आणि विविध साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली.
कोरोनातील मरगळ झटकण्यासाठी गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याने बाजारपेठेला मोठा आधार दिला होता. त्यानंतर बाजारपेठेत खऱ्या अर्थाने उत्साहाला उधाण आले आणि परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. आगामी लग्नसराईच्या पार्श्‍वभूमीवरही गुढीपाडव्याच्या निमित्ताने खरेदीला उधाण येणार आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात विविध उपकरणांच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध असून हेल्थ इक्वीपमेंटस्‌नाही मागणी राहणार आहे. सोन्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले असले तरी सराफ कट्ट्यावर उत्साहाचे वातावरण आहे. सोने, चांदी व हिऱ्यांचे दागिने खरेदीवरही आकर्षक सवलती असून घडणावळीवरही आकर्षक सवलत दिली जाणार आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातही तेजी असून अनेक नवीन प्रकल्पांना मुहूर्तावर प्रारंभ होणार असून काही ठिकाणी फ्लॅट, फ्लॉट व रो हाऊसेस बुकिंग होणार आहे. सर्वांना परवडणारी घरे विविध योजनांतून उपलब्ध होणार आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात ई-बाईकला मागणी वाढती असून बुकिंगसाठी गेली आठवडाभर गर्दी आहे.
-------------
चौकट
विविध उपक्रमांनी
होणार नववर्षाचे स्वागत
गुढीपाडवा पहाट मैफल, नववर्षारंभ अशा सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच शोभायात्रा, धर्मदिंडी आदी उपक्रमांनी नववर्षाचे स्वागत होणार आहे. अशा उपक्रमांत सहभागी होणाऱ्यांनाही विविध निर्मिती संस्था, कंपन्यांनी सवलती जाहीर केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT