कोल्हापूर

राज्यात एसटी महिला कोल्हापूर

CD

महिलांसाठीच्या सवलत योजनेत
कोल्हापूर राज्यात ‘नंबर वन’
---
‘एसटी’लाही लाभ; दिवसात ९८ हजार महिलांचा प्रवास
कोल्हापूर, ता. २१ : राज्य शासनाने महिलांना एसटी तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत दिली आहे. या योजनेला महिलांकडून उदंड प्रतिसाद लाभत असून, राज्यात कोल्हापूर विभाग ‘नंबर वन’ ठरला आहे. सोमवारी एका दिवसात ९८ हजार महिलांनी सवलत योजनेचा लाभ घेतला. परिणामी, नवी सवलत योजना ‘एसटी’साठी संजीवनी ठरणार आहे.
एसटी महामंडळातर्फे राज्यातील ३० घटकांना प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येते. गेल्या काही महिन्यांपूर्वी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली. आजवर सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. या पाठोपाठ राज्य शासनाने महिला प्रवाशांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली. त्याची अंमलबजावणी सुरू असून, एसटी बसला महिलांची गर्दी वाढू लागली आहे.
‘एसटी’ची राज्यातील एकूण प्रवासी संख्या रोजची ५५ लाखांच्या आसपास आहे. यात ३० टक्के महिला प्रवासी आहेत. उर्वरित १४ ते १६ टक्के महिला या खासगी वाहनाने प्रवास करतात. किंवा प्रवास न करणाऱ्या आहेत. अशा महिला सवलतीमुळे ‘एसटी’ने प्रवास करू लागल्या आहेत. विशेषतः नोकरी, व्यावसायिक महिला, दीर्घपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या, तीर्थाटनाला जाणाऱ्या महिला व व्यक्तिगत स्तरावर प्रवास करणाऱ्या महिलांचा योजनेला प्रतिसाद वाढला.
कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर, सावंतवाडी, रत्नागिरी या मार्गावर सर्वच बसना महिलांचा प्रतिसाद आहे; तर ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या किंवा जाणाऱ्या महिला नोकरदार व रोजगारदार महिला रोज खासगी वाहतुकीचा आधार घेत होत्या. अशा महिला योजनेमुळे ‘एसटी’कडे वळल्या आहेत.
---------------
चौकट
‘एसटी’च्या महसुलात भर
सवलतीतून प्रवास केल्यास त्या सवलतीची रक्कम राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला प्रतिपूर्तीची रक्कम म्हणून दिली जाते. ५० टक्के सवलतीच्या योजनेला महिलांचा प्रतिसाद असाच वाढता राहिल्यास एसटीला प्रतिपूर्तीची रक्कम वाढून एसटी महसुलात भर पडणार आहे.
---------------
सोमवारी एका दिवसातील महिला प्रवासी
कोल्हापूर ९८,४१९
जळगाव ७३,४७०
सांगली ७१,२२९
पुणे ५५,२५८
सातारा ६२,०६७
सोलापूर ४६,८०७
जालना १४,४१९
---------------
कोट
वाढत्या प्रवासी खर्चामुळे अनेक महिलांना घरातून बाहेर पडून कर्तृत्व सिद्ध करणे अशक्य होते. अशा महिलांना ‘एसटी’च्या सवलत योजनेमुळे संधी मिळाली आहे. महिला सक्षमीकरणाचे पाऊल म्हणून या संधीकडे पाहता येईल.
- शोभना जगताप, कदमवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT