कोल्हापूर

‘कुलगुरू चषक’साठी आज मुंबई-पुणे संघ भिडणार

CD

90587
कोल्हापूर : कुलगुरू चषक टी-२० स्पर्धेतील शिवाजी विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ यांच्यात रंगलेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात गोलंदाज विश्‍वनाथ वरुटे याने पुण्याच्या फलंदाजास बाद केले तो क्षण.

कुलगुरू चषकासाठी
आज ‘मुंबई-पुणे’ भिडणार
तृतीय क्रमांकासाठी शिवाजी विद्यापीठ लढणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : शिवाजी विद्यापीठात राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. त्यात आज झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यांत मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांनी अनुक्रमे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि शिवाजी विद्यापीठ यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. या दोन्ही संघांमध्ये उद्या (ता. २२) विजेतेपदासाठी, तर नांदेड आणि शिवाजी विद्यापीठात तिसऱ्या क्रमांकासाठी लढत होणार आहे.
आज उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मुंबई विद्यापीठाने नांदेडच्या संघाचा १६ धावांनी पराभव केला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना नांदेड संघ २० षटकांत ८ बाद १३३ धावांच करू शकला. त्यांच्याकडून नरशी कागडा यांनी १९ धावा केल्या. मुंबईच्या संजय भालेराव आणि प्रवीण मुळम यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. मुंबईकडून १४ धावा आणि ३ बळी घेणारे प्रवीण मुळम ‘सामनावीर’ ठरले. उपांत्य फेरीचा दुसरा सामना शिवाजी विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात झाला. अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या रोमहर्षक सामन्यात शिवाजी विद्यापीठाला पुण्याकडून अवघ्या ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पुणे विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १३७ धावा केल्या. पुण्याच्या मनीष गायकवाड यांनी ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली, तर नितीन प्रसाद यांनी ३६ धावा केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या सिद्धार्थ लोखंडे यांनी ३२ धावांत ४ बळी, तर अजय आयरेकर यांनी ३१ धावांत २ बळी घेतले. विनायक शिंदे आणि विश्वनाथ वरुटे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवाजी विद्यापीठाचा संघ २० षटकांत ७ बाद १३४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यामध्ये विनायक शिंदे यांच्या ४१ तर विशाल हिलगे यांच्या ३० धावांचा समावेश आहे. पुण्याच्या सुनील मते, विनोद नरके यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पुण्याकडून अर्धशतकी खेळीसह १ बळी घेणारे मनीष गायकवाड ‘सामनावीर’ ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT