कोल्हापूर

कर्मचारी कामावर

CD

90594


सरकारी कार्यालये गजबजली

खोळंबलेली कामे करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २१ : बेमुदत संपावर असणाऱ्या शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षककेतर कर्मचाऱ्यांनी आज कामावर हजेरी लावल्याने ओस पडलेली सरकारी कार्यालये आज पुन्हा गजबजली. संपात ९२ विविध विभागांच्या कार्यालयातील ८० हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे विविध दाखले, कर भरणा, दस्त नोंदणीसारख्या रखडलेल्या कामांना गती मिळाल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये हाऊसफुल्ल झालेली दिसून आली. दरम्यान, आता उद्या (ता. २२) गुढी पाडव्याची सुटी असल्याने पुन्हा सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.
जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी राज्यभर पुकारलेल्या बेमुदत संपाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला. बेमुदत संपामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, छत्रपती प्रमिलाराजे शासकिय रुग्णालय, आरोग्य विभाग, कृषी विभाग, आयकर कार्यालय, जलसंपदा विभाग, जिल्हा पुरवठा कार्यालय, जिल्हा पुनर्वसन कार्यालय, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य उपसंचालक कार्यालय, कोषागार कार्यालय, शिक्षण उपसंचालक कार्यालयांचे काम ठप्प झाले. लोकांना यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. वेळेत काम होत नसल्याने त्यांनी संतापही व्यक्त केला. दरम्यान, शासनाच्या आश्‍वासनानंतर संपकऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेवून आजपासून काम सुरु केले. त्यामुळे सात दिवसांपासून खोळंबलेली कामे करण्यासाठी शासकीय कार्यालयात प्रचंड गर्दी दिसून आली. आरोग्य सेवा सुरु झाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
...

प्रोदशिक परिवहन कार्यालयात तुडूंब गर्दी

सात दिवसांच्या संपानंतर शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरु झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली. गर्दीमुळे आजही अनेकांची कामे पूर्ण झाली नाहीत. त्यांना पुन्हा परिवहन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT