कोल्हापूर

आनंदाचा शिधा

CD

‘आनंदाचा शिधा’ न मिळाल्याने
पाडव्याच्या आनंदावर विरजण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : राज्य शासनाने गुढी पाडव्यासाठी जाहीर केलेला ‘आनंदाचा शिधा’ आदल्या दिवशीपर्यंत मिळालाच नाही. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हा शिधा देता आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख रेशन कार्डधारकांची प्रतीक्षा फोल ठरली आहे.
गरीब रेशन कार्डधारकांना गुढी पाडव्याला धान्य मिळावे, यासाठी आनंदाचा शिधा देण्याचे शासनाने जाहीर केले होते. गुढी पाडवा सण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा शिधावाटप केला जाणार होता. मात्र, याच रेशनकार्डवर एकही शिधा आलेला नाही. तसेच अद्याप त्याचे टेंडरही निघाले नसल्याची माहिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने काही दिवसांतच शिधा देण्याचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील पाच लाख रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळतो. दिवाळीत याचा अनेकांना लाभ झाल्याने समाधान व्यक्त केले जात होते. आताही गुढी पाडव्याला शिधा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हा अपेक्षा भंग झाला आहे. एकाही स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा आला नसल्याने रेशन ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.
...
असा असेल आनंदाचा शिधा :
१ किलो साखर, १ लिटर पामतेल, १ किलो हरभरा डाळ आणि १ किलो रवा या वस्तूंचा शिधा किटमध्ये समावेश आहे. पाडव्याच्या आधी हे किट मिळाले असते तर अनेकांना सण साजरा करता आला असता, पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हा शिधा आता काही दिवसांनंतर मिळणार असल्याचे चित्र आहे.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT