कोल्हापूर

आयजीएममध्ये उभारली आरोग्याची गुढी

CD

ich221.jpg
90681
इचलकरंजी : आयजीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांतर्फे आमदार आवाडे यांचा सत्कार केला.

आयजीएममध्ये उभारली आरोग्याची गुढी

इचलकरंजी, ता. २२ : शहरातील आयजीएम रुग्णालयात प्रथमच गुढी उभारली. रुग्णालयास ३०० बेडची मान्यता मिळवून देण्यामध्ये विशेष प्रयत्न केलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांचे आभार मानून सत्कार केला. आयजीएम रुग्णालय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होऊन राज्यातील अत्युच्च दर्जाचे रुग्णालय बनेल, असा विश्‍वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.
शहर परिसर व कर्नाटक सीमा भागातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांचे आधारवड असलेल्या आयजीएम रुग्णालयास राज्य शासनाने नुकतीच ३०० बेडची मान्यता दिली आहे. याचे औचित्य साधत रुग्णालयाच्या आवारात आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते गुढी पाडव्यानिमित्त आरोग्याची गुढी उभारली. साखर व पेढे वाटून आनंद साजरा केला. रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. नंदकुमार बनगे, डॉ. महेश महाडीक, राजू पाटील, भरत शिंदे, तेजस पाटील, बाबासाहेब चौगुले, स्वप्निल आवाडे, डॉ. राहुल आवाडे आदी उपस्थित होते.
------------
महामारीत कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या
रुग्णालयास ३०० बेड मंजूरी मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता अधिक भासणार आहे. कोरोनामध्ये रुग्णालयात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके यांनी आमदार प्रकाश आवडे यांच्याकडे केली. याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार आवडे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Pune News: गॅस पाइपलाइनसाठी केंद्राची नवी नियमावली; परवानगी प्रक्रियेतील अडथळे दूर, घरगुती पीएनजी वापराला मिळणार गती

Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

IPL 2026 Marathi News: हर्षित राणाच्या जागी KKR च्या ताफ्यात भारताचा स्पीडस्टार... गुजरात टायटन्सनेही खेळाडू बदलला

SCROLL FOR NEXT