कोल्हापूर

सकाळचा पाठुपुरावा

CD

लोगो - आमचं शहर, आमचं बजेट

अंदाजपत्रकात नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब
कोल्हापूर, ता. २३ ः विविध क्षेत्रातील थेट शहरवासीयांपर्यंत पोहोचून ‘सकाळ’ने महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या होत्या. त्या अपेक्षांमधून तयार केलेली ‘आमचं शहर, आमचं बजेट’ ही पुस्तिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यातील अपेक्षा तसेच महत्वपूर्ण सुचनांचा अंतर्भाव महापालिकेने अंदाजपत्रकात केला. त्यासाठी मोठ्या निधीची तरतूदही केली आहे.
शहराच्या विकासासाठी नेमके काय हवे हे त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासू नागरिकांपर्यंत पोहचून ‘सकाळ’ने चर्चा घडवून आणली होती. त्यात विविध योजनांबाबत अपेक्षा व्यक्त करताना महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या होत्या. त्याची ‘आमचं शहर, आमचं बजेट’ या पुस्तिकेतून मांडणी केली होती. ती प्रशासक डॉ. बलकवडे यांच्याकडे सुपूर्द केली होती. अंदाजपत्रकात त्यातील अपेक्षांचा समावेश करू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. आजच्या अंदाजपत्रकात अनेक योजनांचा समावेश केल्याचे दिसून आले.
स्मशानभूमीतील पारंपरिक साधनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ‘सकाळ’ने सातत्याने विद्युत दाहिनीचा पाठपुरावा केला होता. त्याचा संदर्भ देत प्रशासक डॉ. बलकवडे यांनी पंचगंगा तसेच कसबा बावडा स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी दोन कोटी ९० लाख रूपयांची तरतूदही केली असल्याचे सांगितले. याशिवाय बचत म्हणजे उत्पन्नात वाढ होत असते, असे सांगत अनेक तज्ज्ञांनी वीज खर्चात बचत करण्यासाठी सौर उर्जा वापरण्याचा मुद्दा मांडला होता. पाणीपुरवठा विभागाच्या उपसा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी सौर उर्जेची यंत्रणा वापरण्याचे महापालिकेने निश्‍चित केले आहे. त्यासाठी एक कोटी २० लाखांची तरतूद केली आहे. तसेच महापालिका कार्यालयांच्या इमारती, दवाखान्यांच्या इमारतीतही ही यंत्रणा बसवण्यासाठी ३० लाखांचा निधी प्रस्तावित केला आहे. याशिवाय रसिक तसेच कलाकारांकडून आणखी एक आर्ट गॅलरीची मागणी केली जात होती. त्यानुसार राजारामपुरीतील जगदाळे हॉलमध्ये आर्ट गॅलरी उभी करण्यासाठी २० लाखांची तरतूद केली आहे.
----------------
चौकट
स्वच्छतागृहांसाठी दोन कोटींची तरतूद
शहरात पर्यटकांची संख्या मोठी असून स्वच्छतागृहांअभावी तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेतून शहराची प्रतिमा डागाळते. हे लक्षात घेवून सात ठिकाणी स्वच्छतागृह उभारणीसाठी प्रशासनाने दोन कोटींची तरतूद केली. तसेच पार्किंगच्या जागांचा वापर, पाणी गळती रोखण्यासाठी वॉटर ऑडीट, उद्यानांची सुधारणा,कचरा उठाव, रस्ते सफाईबाबतच्या मुद्द्यांचाही अंदाजपत्रकात समावेश झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचा पट्टा सक्रीय, राज्यात 'या' भागात मुसळधार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मी २ महिन्यांची गर्भवती, निदा खानची अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव; तर पोलिसांची ५ पथकं अजूनही घेतायत शोध

Akshaya Tritiya gold rate : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं महाग, चांदीही वधारली; वाचा आजचा नवा भाव

'गजवा ए हिंद'च्या नावावर धर्मांतराचा प्रयत्न, दारू अन् सिगारेट पिण्यासाठी बळजबरी, लव्ह बाइट म्हणत तरुणीच्या शरीरावर केल्या जखमा

Akshaya Tritiya Wishes in Marathi: लक्ष्मी कृपा, सुखाचा वर्षाव...साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेच्या कुटुंब अन् मित्रपरिवाराला द्या मराठीतून खास शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT