कोल्हापूर

आजरा कारखान्याची निवडणुक जूनमध्ये शक्य

CD

आजरा कारखान्याची निवडणुक जूनमध्ये शक्य
प्रारुप मतदार यादी करण्यास प्रारंभ; संस्था प्रतिनिधीचे ठराव प्रक्रिया सुरु
आजरा, ता. २३ ः आजरा तालुक्यातील महत्वाची शिखर संस्था असलेल्या आजरा साखर कारखान्याची निवडणुक जूनमध्ये लागण्याची शक्यता आहे. प्रारुप मतदार यादी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संस्था प्रतिनिधी ठराव मागण्यात आले आहेत. २१ मार्च ते २४ एप्रिलपर्यंत ठराव दोन प्रतीत द्यावे, असे आवाहन जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांनी केले आहे.
२०२३ ते २०२८ या पंचवार्षिकसाठी आजरा साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. कोरोना व विविध कारणांमुळे निवडणूक दीड वर्ष लांबणीवर पडली होती. त्याची ठराव प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रारुप मतदार यादीसाठी संस्था ठराव मागण्यात आले आहेत. आजराकडे १६६ संस्था सभासद आहेत. यामध्ये विकास सेवा संस्था, दूध संस्था, पाणी पुरवठा संस्था व पतसंस्था अशा ब वर्ग संस्था सभासद प्रतिनिधीचे ठराव २४ एप्रिल द्यावयाचे आहेत. या ठरावाची नोंद झाली की प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये कारखान्याचे अ वर्ग सभासद संख्या २५ हजार १८३ इतकी आहे. ब वर्ग व्यक्ती सभासद संख्या ७ हजार ३०० इतकी आहे. १ फेबुवारी २०२३ च्या अर्हता तारखेवर सभासद यादीनुसार प्रारुप मतदार यादी तयार करावयाची आहे. ही यादी प्रसिद्धीनंतर हरकती मागितल्या जातील. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्धीनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कारखान्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे. कारखाना निवडणुकीपूर्वी आजरा तालुका शेतकरी संघाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचे पडसाद कारखाना निवडणुकीवर पडणार आहेत.
-------------
नेतेमंडळींच्या भूमिकेकडे लक्ष
सध्या तालुक्यात आजरा अर्बन, आजरा सुतगिरणी, जनता बॅंक आजरा, स्वामी विवेकानंद पतसंस्था या प्रमुख संस्थाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आजरा तालुका शेतकरी संघ व आजरा कारखान्याची निवडणुकही बिनविरोध व्हावी असा मतप्रवाह आहे. या दोन संस्थाच्या बाबतीत नेतेमंडंळी कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT