कोल्हापूर

विमानतळ विस्तारीकरणाची २८० कोटींची कामे ऑक्टोबर अखेर पूर्ण होणार

CD

विमानतळ विस्तारीकरणाची कामे
ऑक्टोबरअखेर पूर्ण करणार ः शिंदे

उजळाईवाडी, ता. २३ ः कोल्हापूर विमानतळ विकास आणि विस्तारीकरणाची सध्या एकूण २८० कोटींची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करण्यात येतील. कोल्हापुरातून देशातील इतर नव्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज येथे दिली.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी सकाळी दहा वाजून ३७ मिनिटांनी केंद्रीय मंत्री शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर विमानतळावर टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर, पार्किंग ॲप्रन, त्याचबरोबर धावपट्टीचे २३०० मीटर पर्यंत विस्तारीकरण आदी विकासकामे सुरू आहेत. दीड वर्षात देशातील अन्य प्रमुख शहरांना विमानसेवा सुरू करून कोल्हापूरची एअर कनेक्टिव्हिटी वाढवली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, सम्राट महाडिक, राहुल आवाडे, सत्यजित देशमुख आदींनी स्वागत केले.

चौकट
तिसऱ्यांदा दौरा
दरम्यान, ‘लोकसभा प्रवास’ या भाजपच्या कार्यक्रमानुसार मंत्री शिंदे हे आता सलग तिसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मागील दोन दौऱ्यात त्यांनी चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यांमध्ये सरकारने राबविलेल्या योजना, विकासकामांचा आढावा घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT