कोल्हापूर

मंदिरात महत्त्वाचे काय

CD

91247

तुला महत्वाची की भाविकांसाठी आरोग्य केंद्र?
अंबाबाई मंदिरातील बंद केलेले आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः अंबाबाई मंदिरात दक्षिणात्य पद्धतीच्या प्रथा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले मंदिरातील आरोग्य केंद्र बंद पाडून या ठिकाणी भव्य तुला उभी केली आहे. भाविकांच्या सुविधांऐवजी मंदिरात अशा प्रथांचा बोलबाला सुरू आहे.
दरम्यान, आज दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा ‘सीपीआर''मध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी या भाविकाला ‘सीपीआर''मध्ये दाखल केले. पण, मंदिरातच प्राथमिक आरोग्य केंद्र असते तर तत्काळ उपचारांनी ‘गोल्डन अवर''मध्ये या भाविकाला वाचवणे शक्य झाले असते. या घटनेमुळे आता पुन्हा मंदिरात चोवीस तास आरोग्य केंद्राची गरज अधोरेखित झाली आहे.
अंबाबाई मंदिरात देवीच्या नैवैद्यापासून तिच्या नित्यपूजा, उत्सवपूजा या सगळ्यांच्या प्रथा परंपरा या ठरलेल्या आहेत. त्यानुसार नित्य व उत्सव काळात सेवा होतात. समितीचे उत्पन्न वाढावे म्हणून काही प्रथा सुरू केल्या जात आहेत. विशेषतः दक्षिणेकडील मंदिरातील या प्रथा घेतल्या जात असल्याचे दिसते. यातील नविन प्रथा म्हणजे तुला पद्धत. दक्षिणकडील मंदिरात यामध्ये मंदिरात आलेल्या भाविकाची तुला केली जाते आणि त्यातून उत्पन्न घेतले जाते, त्याच पद्धतीची सुविधा अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीच्या शेजारी केली आहे.
ही नविन प्रथा सुरु करताना भाविकांना अत्यंत महत्त्वाच्या असलेले आरोग केंद्र बंद करण्यात आले आहे. हे केंद्र बंद केल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. आता पर्यटनाचा कालावधी सुरू झाली की त्याची गरज अधिक अधोरेखित होईल. भाविक दिनेश पाटील म्हणाले, ‘मंदिर आवारात तातडीने प्राथमिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. देवीच्या दर्शनासाठी परजिल्ह्यातून, परराज्यातील भाविक येत असतात त्यांना तातडीने उपचार मिळाले पाहिजेत. यासाठी देवस्थान समितीने व्यवस्था करावी.’

चौकट
संघटनांनीही पुढाकार घ्यावा..
मंदिराच्या आवारात भाविकांना सुविधा देणे, त्यांना चांगले दर्शन होणे हे प्राधान्य असले पाहिजे. परंतु, या ठिकाणी तुलासारखी दक्षिणात्य प्रथा सुविधा सुरू करून काय देणार असा प्रश्न तयार होत आहे. मंदिरातील चुकीच्या गोष्टीविरुद्ध नेहमी पुढाकार घेणाऱ्या संघटनांना यासाठीही आता भूमिका घ्यावी लागणार आहे. सुविधा की तुला, हे ठरवावे लागणार आहे.

चौकट
आम्ही कायस्वरूपी डॉक्टर ठेवू- रेखावार
मंदिरात तयार करण्यात आलेली तुला तिथेच राहील. या ठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी म्हणून आरोग्य केंद्रही सुरू राहणार आहे. तिथे कायमस्वरूपी डॉक्टर नेमण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. भाविकांना तातडीने वैद्यकीय सुविधा देण्यासाठी ठोस पाऊले उचलले जातील, असे जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष राहूल रेखावार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT