कोल्हापूर

औरंगाबाद खंडपीठ

CD

कोल्हापूर खंडपीठाला
माझा जाहीर पाठिंबा
न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर, ता. २५ ः औरंगाबाद खंडपीठाने अनेक चांगले न्यायाधीश आणि वकील दिले. त्यामुळे मराठवाड्याचा दर्जा कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. तीच परिस्थिती कोल्हापूरचीही आहे. सध्या कोल्हापूर खंडपीठ स्थापण्याचाही विषय प्रलंबित आहे. पक्षकारांना न्यायासाठी मुंबईला जावे लागते. त्यामुळे कोल्हापूरला खंडपीठ व्हावे, यासाठी माझा जाहीर पाठिंबाच आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज येथे व्यक्त केले.
औरंगाबाद खंडपीठातील २७० लॉयर्स चेंबरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी श्री. गवई बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रारंभ फित कापून कोनशिलेचे अनावरण करत चेंबर्सचे उद्‌घाटन करण्यात आले.
यावेळी श्री. गवई म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुंबईपेक्षा अधिक याचिका दाखल होतात, याचाच अर्थ खंडपीठ स्थापनेचा उद्देश सफल झाला. मात्र, सर्वसामान्य पक्षकार आपल्याकडे आशेने पाहतो, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळेच शेवटच्या घटकातील सामान्य व्यक्तीलाही कमी खर्चात न्याय मिळेल, ही वकिलांसह न्यायालयाची जबाबदारी आहे. श्री. गवई म्हणाले, ‘‘या खंडपीठाची स्थापना संघर्षातून झाली. अनेकांचे यासाठी योगदान आहे. त्या सर्वांच्या स्मरणाचा हा दिवस आहे.’’ न्यायमूर्ती ओक म्हणाले, ‘‘या खंडपीठाकडे येणाऱ्या प्रकरणांची संख्या मुंबईपेक्षाही खूप मोठी आहे. हे सारे प्रश्न येथील गोरगरीब, सर्वसामान्यांचे आहेत. त्यांना न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून होत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबईकरांची प्रतीक्षा वाढणार, अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार; ओसी मिळण्याबाबत पालिकेचा मोठा निर्णय

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

Pune News : भाजपच्या आणखी दोन नगरसेविकांमधील वाद चव्हाट्यावर; शहरातील नेत्यांचे दुर्लक्ष

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

SCROLL FOR NEXT