कोल्हापूर

काजू बीचा बाजार एप्रिलमध्ये वधारणार

CD

ajr272.jpg....
91801
आजरा ः काजू् काट्यावर व्यापारी प्रतिक्षेत होते.
ृृृृृृृृृृृृ----------
काजू बीचा बाजार एप्रिलमध्ये वधारणार
परदेशीमुळे स्थानिक बीला फटका ः दरात वाढ नाही
सकाळ वृतसेवा
आजरा, ता. २७ ः बाजारात काजूची आवक म्हणावी तशी दिसत नाही. शुक्रवारचा आठवडा बाजारही थंडा.. थंडा.... कुल कुल होता. पुरेशी उलाढाल झाली नाही. एप्रिलच्या मध्यावर काजू बीचा बाजार वधारणार असून स्थानिक बी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होईल. पण स्थानिक बीला म्हणावा तसा दर मिळेल असे वाटत नसल्याचे सांगण्यात येते. सध्या शंभरच्या आतच स्थानिक काजू बीची विक्री होत आहे. काजू प्रक्रिया युनिटधारकांकडून परदेशी काजू बीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
यंदा काजूचे उत्पादन चांगले होणार असल्याची चिन्हे आहेत. वातावरण, कीड, रोगाचा फटका काजू उत्पादनावर विशेष झाला नाही. तरीही धुके व थंडी काही प्रमाणात राहिल्याने काजू बी तयार होण्यास वेळ लागला. दरवर्षी मार्चच्या अखेरीस काजू बी बाजारात येत असते. यंदा मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून काजू बीची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात होईल, असे सांगण्यात येत आहे. दोन तीन आठवडा बाजार रिकामेच गेले. काजूची आवक मोठ्या प्रमाणात झाली नाही. शुक्रवारच्या आठवडा बाजारात सात आठ व्यापाऱ्यांनी काटे लावले होते. त्यांच्याकडे चार - पाच क्विंटल स्थानिक मालाची आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या परदेशातून काजू बीची आवक सुरु आहे. ११० रुपयांपासून १३० पर्यंत दर्जानुसार परदेशी मालाची खरेदी होत आहे. अधिक प्रमाणात परदेशी माल काजू कारखानदारांकडून खरेदी केला जात आहे. या काजू बीला उतारा चांगला असल्याने मागणी आहे. स्थानिक काजू बी शंभर रुपये प्रतिकिलो खरेदी केली जात आहे.
--------------
कोकणातील स्थानिक बीची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाल्याने ११० रुपये प्रतिकिलो चांगल्या प्रतीचा माल बाजारात उपलब्ध होत आहे. त्यामुळे आजरा परिसरातील काजू बीचा दर १०० रुपये प्रतिकिलो आहे. यंदा काजू बीचा काऊंट किलोला २०० ते २१० इतका असल्याने मागणी जास्त नाही. एप्रिलनंतर स्थानिक काजू बी बाजारात येईल.
- अक्षय बिल्ले, काजू व्यापारी, आजरा
------------
दृष्टीक्षेप
आजरा तालुक्यातील काजू लागवड ः ४ हजार ६०० हेक्टर
सरासरी उत्पादन ः ९०० ते १२०० किलो सरासरी हेक्टर
तालुक्यातील वार्षिक उत्पादन ः ४ हजार टन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT