कोल्हापूर

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

CD

gad91.jpg
94572
बड्याचीवाडी : प्राथमिक शाळा दुरुस्ती कामाच्या प्रारंभ स्नेहा कुंभार यांच्या हस्ते झाला. प्रसंगी समरजित घाटगे, बाजीराव खोत, प्रितम कापसे आदी.
----------------------------
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य
समरजित घाटगे : बड्याचीवाडीत शाळा दुरुस्तीसह विविध विकासकामांचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : केंद्र, राज्य सरकार, जिल्हा नियोजन समिती व इतर माध्यमातून कागल मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे. प्राथमिक शाळांसाठी इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठी चांगला निधी दिला आहे. कागल मतदारसंघातील शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
बड्याचीवाडी पैकी हट्टीबसवाण (ता. गडहिंग्लज) येथे प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसह विविध विकासकामांचा प्रारंभ व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप असा संयुक्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी श्री. घाटगे बोलत होते.
भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे म्हणाले, ‘समरजित घाटगे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समाजकार्याचा वसा आणि वारसा चालवीत आहेत. या निष्कलंक नेतृत्वास येत्या विधानसभा निवडणुकीत निवडून देऊया.’
जनार्दन खोत यांनी स्वागत केले. सरपंच बाजीराव खोत यांनी प्रास्ताविक केले. जनसुविधा योजना, नागरी सुविधा, प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती, अंगणवाडी दुरुस्ती, दलित वस्ती सुधारणा, सौर ऊर्जा प्रकल्प अशा २७ लाख रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ श्री. घाटगे यांच्या हस्ते झाला. वीरेंद्र चौगुले, प्रितम कापसे, उपसरपंच रविंद्र बनगे, सदस्य बाजीराव खोत, सपना पोवार, प्रभावती गुरव, गंगुबाई नारे, छाया बारामतीकर, शकव्वा अर्जुनवाडे, वसंत पोवार, धोंडीराम नारे, राजेंद्र घाटगे, मुख्याध्यापिका स्नेहा कुंभार आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी संदीप तोरस्कर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT