कोल्हापूर

देवल क्लब पुरस्कार

CD

94734
...

पुरस्काराने संगीत क्षेत्रात नवे काही
करण्याची जबाबदारी वाढली

पं. अरुण कुलकर्णी; ‘रसिकराज’ पुरस्कार प्रदान
कोल्हापूर, ता. ९ ः ‘सरदार आबासाहेब मुजुमदार रसिकराज पुरस्कारामुळे अभिजात शास्त्रीय संगीत क्षेत्रात आणखी उल्लेखनीय कार्य करण्याची उमेद वाढली आहे. या पुरस्काराने आनंदाबरोबरच संगीत क्षेत्रात नवे काही करण्याची जबाबदारी वाढवली,’ असे मत जयपूर अत्रोली घराण्याचे गायक पं. अरुण कुलकर्णी यांनी आज येथे व्यक्त केले.
येथील गायन समाज देवल क्लबमध्ये सरदार आबासाहेब मुजुमदार रसिकराज पुरस्कार प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. एन. वाय. जोशी यांच्या हस्ते पं. अरुण कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. शास्त्रीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पं. कुलकर्णी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पं. कुलकर्णी म्हणाले, की देवल क्लबबरोबर माझे दीर्घकाळापासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आजवर गुरू व गायक म्हणून काम करताना कौटुंबिक गुरूकडून आशीर्वाद लाभला. संगीत क्षेत्रातील कोल्हापुरातील मान्यवर कलाकारांचाही मोठा आधार मला आहे.
यानंतर पं. कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन झाले. यात त्यांनी राग यमन सादर केला. त्यांना महेश देसाई यांनी तबला, तर क्षितिजा वेदपाठक यांनी तानपुरा साथ केली.
यानंतर डॉ. एन. वाय. जोशी यांचेही तबलावादन झाले. डॉ. जोशी वैद्यकीय उपचार सेवेबरोबरच छंद म्हणून प्रसिद्ध तबलावादकांकडून तबल्याचे शिक्षण घेत आहेत. वयाच्या पंचाहत्तरीत त्यांनी कला सादर करीत उपस्थितांना थक्क केले. स्वरूप दिवाण यांनी हार्मोनियमची साथसंगत केली. श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी आनंद धर्माधिकारी, प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT