कोल्हापूर

एसटीची ‘नॉनस्टॉप’ तपपूर्ती!

CD

एसटीची ‘नॉनस्टॉप’ तपपूर्ती!
गडहिंग्लज-कोल्हापूर बसफेरी; आगाराला मिळतेय सर्वाधिक उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : रस्त्याच्या कामामुळे प्रवासाला उशीर होऊ लागला. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीवरून गडहिंग्लज-कोल्हापूर ही नॉनस्टॉप (विना थांबा) बसफेरी सुरू झाली. प्रायोगिक तत्त्‍वावरील ही फेरी पुढे कायमस्वरूपी झाली. उद्या (ता. ११) या बसफेरीची तपपूर्ती होत आहे. या बसफेरीतून गडहिंग्लज आगाराला सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे.
नोकरी, व्यवसाय, शासकीय कामानिमित्त गडहिंग्लजहून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांच्या सोयीसाठी येथील आगाराने गडहिंग्लज-कोल्हापूर मार्गावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. या बसफेऱ्या निपाणी, कागलमधून जात होत्या. त्यामुळे प्रवासाला अधिक वेळ लागत होता. त्यातच २०११ मध्ये रस्त्याचे काम सुरू झाले. परिणामी, त्यामध्ये भरच पडली. प्रवासासाठी तब्बल सव्वादोन ते अडीच तास लागू लागले. या वेळी प्रवाशांनी नॉनस्टॉप फेरीची मागणी केली. आगारानेही प्रायोगिक तत्त्‍वावर एक फेरी सुरू केली.
नॉनस्टॉपमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होऊ लागली. त्यामुळे प्रवाशांकडून फेरींची संख्या वाढवण्यासाठी पाठपुरावा सुरू झाला. कोल्हापूरला जाईन तर नॉनस्टॉपनेच जाईन अशी त्यांची भूमिका होती. आगारानेही टप्प्याटप्प्याने फेरींची संख्या वाढवत नेली. सध्या दर अर्ध्या तासाला नॉनस्टॉप फेरी आहे. आता तर ती विना वाहक धावते आहे. त्यामुळे वाहकांच्या पगारावर होणाऱ्या खर्चात बचत झाली आहे. गडहिंग्लज आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणारी फेरी म्हणून गडहिंग्लज-कोल्हापूर नॉनस्टॉप फेरीकडे पाहिले जाते. या फेरीचा आगाराला मोठा आर्थिक आधार आहे. गडहिंग्लज-कोल्हापूर या नॉनस्टॉप फेरी उद्या बारा वर्षे पूर्ण करीत आहे. उद्या सकाळी दहा वाजता आगारामार्फत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
-----------------
अन्य आगाराकडून अनुकरण
एसटी महामंडळाने गडहिंग्लज-कोल्हापूर नॉनस्टॉप बसफेरीचा कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच उपक्रम राबवला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे जिल्ह्यातील अन्य आगारांनीही त्याचे अनुकरण केले. इचलकरंजी, राधानगरी, गारगोटी आगारानेही आपापल्या मार्गावर नॉनस्टॉप बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT