कोल्हापूर

शेती सेवा केंद्राला आग ४-५ लाखांचे नुकसान

CD

दोन फोटो -
...


शाहूपुरीतील शेती सेवा केंद्राला आग

चार ते पाच लाखांचे नुकसान ः वेळीच दक्षता घेतल्याने अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. १० ः शाहूपुरीतील लकी शेती सेवा केंद्रात लागलेल्या आगीत सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. केंद्राच्या पोटमाळ्यातील सर्वच साहित्य जळून खाक झाले. रासायनिक दुर्गंधी सुटल्यामुळे आग रौद्र रुप धारण करणार असल्याचा अंदाज कर्मचाऱ्यांना आला. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर दोन बंबांसहीत आलेल्या जवानांनी आग अटोक्यात आणली. याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली. शॉर्टसर्किट की अधिक उष्म्यामुळे आग लागली याबाबत संभ्रमावस्था आहे.

घटनास्थळावरून आणि अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहूपुरी दुसऱ्या गल्लीत लकी शेती सेवा केंद्र आहे. आज दुपारी तेथील पोटमाळ्यातून रासायनिक दुर्गंधी येत असल्यामुळे कामगारांना तेथे जाणे शक्य झाले नाही. याचवेळ पोटमाळ्यातून सेवा केंद्राच्या फलकाजवळून धूर येवू लागला. अग्निशमन दलाला पाचारण केल्यावर ताराराणी आणि प्रतिभानगर येथील दोन बंबांसहीत सुमारे दहा-पंधरा जवान अधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आग अटोक्यात आली. मात्र तेथे मोठ्या प्रमाणात रासायनिक दुर्गंधी सुटली होती. रस्त्यावरील पूर्ण वाहतूक बंद होती. आग रुद्र रौप धारण करण्यापूर्वीच ती विझविण्यात आली असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज जवानांनी व्यक्त केला.
अग्निशामक दलाचे अधिकारी मनीष रणभिसे, जयवंत खोत, दस्तगिर मुल्ला, ओंकार खेडकर यांच्यासह देवानंद कांबळे, मधुकर जाधव, प्रमोद मोरे, सुभाष दिवसे, राजेंद्र भोसले, विशाल चौगुले, सर्जेराव माने घटनास्थळी होते.
----------

... तर मोठी जीवितहानी
भरवस्तीत आणि दुकानाच्या दुसऱ्या मजल्यापासून वर अपार्टमेंटमधील रहिवाशी आहेत. आगीने रौद्र रुप घेतले असते तर मोठी जीवितहानी सुद्धा होऊ शकली असती. मात्र प्रसंगावधानामुळेच ही आग आटोक्यात आली. या परिसरात आगीमुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक दुर्गंधी पसरली होती. नाकावर रुमाल बांधून जावे लागत होते.
-----------

‘दुकानात किटकनाशक, तणनाशक आहेत. सध्या असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे गरमी वाढली आहे. त्यातूनही आग लागली असण्याची शक्यता आहे. तसेच शॉर्टसर्किटही झाल्याचे दिसून येत आहे. दुकानात सुमारे ४०-५० लाखांचा माल आहे. मात्र केवळ ४-५ लाखांचेच नुकसान झाले आहे. जिवीतहानी झालेली नाही.
वासिम मुजावर, दुकान मालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT