कोल्हापूर

भूमी अभिलेख विभाग दिन

CD

94942
...
मोजणीबाबत चांगल्या पध्दतीने
शासकीय सुविधा पुरवाव्यात

जिल्हाधिकारी ःभूमी अभिलेख विभागातर्फे राष्ट्रीय भूमापन दिन कार्यक्रम

कोल्हापूर, ता. १० ः भूमी अभिलेख विभागातर्फे राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. इतिहास संशोधक सावंत, डॉ. संदीप पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मार्गदर्शन करताना प्रशासकीयदृष्ट्या मोजणीचे आणि भूमी अभिलेख विभागाचे महत्व अधोरेखित केले. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अत्यंत निष्ठेने कामकाज करुन सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत चांगल्या पध्दतीने मोजणी व फेरफाराबाबत शासकीय सुविधा पुरविण्याचे आवाहन केले.
इंद्रजीत सावंत यांनी शिवकालापासून असलेल्या मोजणीच्या विविध पध्दतीबरोबरच प्रतवारी, किल्ल्याचे नकाशे, बांधकाम नकाशे आदींबाबत माहिती दिली. डॉ. पाटील यांनी मानसिक ताणतणाव, बदलती जीवनशैली, व्यायाम, ध्यानधारणा याबाबतची माहिती दिली. कार्यक्रमात शिरस्तेदार संभाजी कुंभार, परिरक्षण भूमापक राजेंद्र पाटील यांच्यासह २३ गुणवंत कर्मचाऱ्यांचे गौरव झाले. नगर भूमापन अधिकारी किरण माने यांनी प्रास्ताविक केले. करवीरचे उपअधीक्षक सुधाकर पाटील, ईचलकरंजी नगरभूमापन अधिकारी शशिकांत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. भूमी अभिलेख कास्ट्राईब संघटनेचे आसिफ पठाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT