कोल्हापूर

मधुमेहातून मुक्तीचा आनंद, पुस्तकाचे प्रकाशन

CD

94950
....

होमिओपॅथीने आरोग्याचे लोकशाहीकरण केले

डॉ. बी. एम. हिर्डेकर ः डॉ. प्रकाश शिंदे यांच्या ‘मधुमेहातून मुक्तीचा आनंद’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर, ता. १० : ‘जर्मनीतील डॉ. सॅम्युअल हानेमान यांनी होमिओपॅथी शाखेची निर्मिती केली. ही शाखा जगभरात विस्तारली गेली. या पॅथीने अनेक घातक आजार बरे होतात. अनेकांनी या होमिओपॅथी औषधांचा वापर करून आपले आरोग्य सुधारले. खरेतर, अन्य पॅथींपेक्षा होमिओपॅथीने आरोग्याचे लोकशाहीकरण केले,’ असे प्रतिपादन डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी केले.

(कै.) सौ. शकुंतला वसंतराव शिंदे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज शाहू स्मारक भवन येथे डॉ. प्रकाश शिंदे यांच्या ‘मधुमेहातून मुक्तीचा आनंद’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. वैष्णवी अंदुरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. हिर्डेकर म्हणाले, ‘‘ज्या डॉक्टरांकडे ‘हिलींग टच, हिलींग वर्ड’ असते, ते कोणत्याही रुग्णाला दिलासा देतात. संवादाच्या माध्यमातून रुग्णांना ऊर्जा देतात. खरेतर, हा ‘टच’ अनेक डॉक्टरांकडे नाही, हे वास्तव आहे. डॉ. शिंदे म्हणूनच रुग्णांची आशा आहे. मन-मेंदूचा सुंदर मिलाफ डॉ. शिंदे यांच्याकडे आढळतो. ते रुग्णांना आधार देतात, रुग्ण बरा होतो. ‘मधुमेहातून मुक्तीचा आनंद’ या पुस्तकात त्यांनी असे किस्से नमूद केले आहेत. हे पुस्तक सुंदर आहे. प्रत्येकाने त्याचे वाचन केले पाहिजे.’

लेखक डॉ. प्रकाश शिंदे म्हणाले, ‘डॉ. हनेमान यांची आज जयंती. माझ्या जीवनातील हा सोन्याचा दिवस. याच दिवशी माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे, हा दुग्धशर्करा योग आहे. होमिओपॅथीमुळे मी प्रसिद्ध झालो. मी लिहीत गेलो. आहार-विहार-आचार पाळा, योगासने करा. कार्यरत राहा. दोष दूर झाला की, मधुमेह होणार नाही. शंभर वर्षे जगाल.’

आसावरी शिंदे-कदम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. हिर्डेकर, डॉ. नंदकुमार मोरे, गंगाधर दिवेकर, भरत बुटाले यांचा यावेळी सत्कार झाला. कवी अशोक भोईटे यांनी ‘कविता माझी स्वागताची’द्वारे उपस्थितांचे स्वागत केले. रिषिता शिंदे यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यासह शिंदे कुटुंबातील सर्व सदस्य, मनाली सहस्त्रबुद्धे, मिलीन सहस्त्रबुद्धे, आदित्यवर्धन शिंदे, दिलीप ठकार, रमेश मोदी, ॲड. युगंधरा मोदी आदी उपस्थित होते.
...


चाफ्यांची फुले...!

श्री. भोईटे यांच्या कवितेच्या ओळींबरोबरच काही मान्यवरांचा सत्कार करताना चाफ्याची फुले, गुलाब, शाल, श्रीफळाचा वापर करण्यात आला. पुस्तक प्रकाशनावेळी चाफ्यांच्या फुलांचा प्रथमच असा वापर केला गेला, हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT