कोल्हापूर

आजरा ः पोलीस वृत्त

CD

आजरा- देवकांडगाव मार्गावर विदेशी मद्य पकडले

आजरा पोलिसांची कारवाई ः ४ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त


आजरा, ता. १० ः आजरा- देवकांडगाव मार्गावर विनायकवाडी (ता. आजरा) येथे विदेशी मद्याचे बॉक्स भरलेला छोटा टेम्पो आजरा पोलिसांनी पकडला. गोवा बनावटीचे विदेशी मद्य विक्रीसाठी विनापरवाना महाराष्ट्रात जात होते. पोलिसांनी शनिवारी (ता.८) रात्री साडे नऊ वाजता सापळा रचून हा माल पकडला आहे. याबाबत दोघांच्यावर आजरा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये छोटा टेम्पोसह एकूण ४ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस हवालदार सुनिल कोईंगडे यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांतून मिळालेली माहीती अशी, गवसे मार्गे गोवा बनावटीचा विदेशी मद्य घेवून छोटा टेम्पो हा विनापरवाना व बेकायेदशीर विक्रीसाठी निघाल्याची खबर आजरा पोलिसांना मिळाली. हा टेम्पो देवकांडगावातून पुढे जाणार असल्याची माहीती होती. दरम्यान, पोलिसांनी विनायकवाडी येथे सापळा रचला. संशयित टेम्पो आल्यावर त्याला अडवण्यात आले. यामध्ये तपासणी केल्यावर विदेशी मद्याचे बॉक्स सापडले. सर्वेश सुभाष मुळये (वय २९, रा. बांधा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजन गुरव (रा. माजगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हा फरार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रशांत पाटील, विशाल कांबळे, प्रदिप देवर्डे, सुनिल काईंगडे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. पोलिस हवालदार चेतन घाटगे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

दिवसभर ACमध्ये बसता? तुमची इम्युनिटी कमी होतेय का? काय काळजी घ्यावी जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : रेडिमिक्स ट्रकवरून सिमेंट सांडत असल्याने आमदार देवयानी फरांदे आक्रमक

SCROLL FOR NEXT