कोल्हापूर

न्यायालय शोकसभा

CD

आंबटकरांच्या निधनाने
न्यायदानाचे नुकसान
जिल्हा बार असो. तर्फे शोकसभा
कोल्हापूर, ता. १० : जिल्हा न्यायाधीश राजकुमार आंबटकर यांच्या अपघाती जाण्याने न्यायदानाचे मोठे नुकसान झाले. ही पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याच्या भावना आज जिल्हा बार असोसिएशन आयोजित शोकसभेत व्यक्त झाल्या.
जिल्हा न्यायालय व जिल्हा बार असोतर्फे राजर्षी शाहू सभागृहात संयुक्त शोकसभा झाली. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल उपस्थित होत्या. जिल्हा न्यायाधीश (क्र. २) एस. आर. साळुंखे यांनी, आंबटकर यांच्या अपघाती जाण्याने न्यायव्यस्थेतील चांगले न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशास मुकलो असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य अॅड. विवेक घाटगे यांनी आंबटकर यांच्या निधनाने चांगला न्यायाधीश गमावल्याचे सांगितले.
यावेळी सचिव अॅड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी राजकुमार आंबटकर, अॅड. गुलाबराव घोरपडे, अॅड. के. एस. पाटील, अॅड. संजय चौगुले यांचे योगदान सांगितले. त्यांच्या मृत्यूने वकील, तसेच राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना व्‍यक्त केली. यावेळी शोक ठराव वाचून दाखवला. वकील आज न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिले. शोकसभेस न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, वकील सभासद मोठ्या प्रमाणात हजर होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश पी. सय्यद, विधी सचिव पी. एम. पाटील, जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. गिरीश खडके यांच्यासह अॅड. महादेवराव आडगुळे, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, अॅड. बाळासाहेब शेळके, अॅड. धनंजय पठाडे, अॅड. आर एम मेहता, अॅड. व्ही. आर. पाटील, अॅड. संदीप चौगुले, अॅड. माणिकराव मुळीक हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT