कोल्हापूर

माहेश्‍वरी सभेचा प्रदग्रहण सोहळा उत्साहात

CD

97700
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभा पदग्रहण समारंभप्रसंगी रामविलास मुंदडा चंदनमल मंत्री, श्रीकांत मंत्री, नितीन धूत, लालचंद गट्टाणी आदी.

इचलकरंजीत माहेश्‍वरी सभेचा
प्रदग्रहण सोहळा उत्साहात
अध्यक्षपदी नितीन धूत, सचिव लालचंद गट्टाणी
इचलकरंजी, ता. २२ : कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ येथील महेश सेवा समिती येथे झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन धूत, सचिव लालचंद गट्टाणी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी या वेळी पदग्रहण केले. उद्योगपती रामविलास मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली व चंदनमल मंत्री त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अखिल भारतीय महिला संघटन दक्षिण विभागाच्या उपाध्यक्षा अनुसया मालू, रामस्वरूप मर्दा, शांतीकिशोर मंत्री, नंदकिशोर भुतडा, श्रीवल्लभ बांगड, पुष्पा काबरा, रामगोपाल मालाणी, लक्ष्मीकांत बलदवा, संजय सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांनी विनम्रपणे समाजोपयोगी कार्य करावे, असे आवाहन चंदनमल मंत्री यांनी या वेळी केले. आपल्या सामाजिक संस्काराची परंपरा कायम ठेवत नव्या पिढीला बरोबर घेऊन कार्याचा वारसा असाच पुढे चालू ठेवावा, असे प्रतिपादन रामविलास मुंदडा यांनी व्यक्त केले. माजी अध्यक्ष श्रीकांत मंत्री यांनी आपल्या कारकीर्दमध्ये केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. नूतन अध्यक्ष धूत यांनी आरोग्य शिबिर आणि गरजू कुटुंबासाठी अत्यंत माफक दरात घरकुल योजना राबवण्याचा संकल्प जाहीर केला. या वेळी उपाध्यक्ष बजरंगलाल काबरा, सुरेशचंद दरगड, दिलीप बजाज (करवीर), राजकुमार बलदवा (जयसिंगपुर) यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात कोषाध्यक्ष अशोककुमार मंत्री, संगठन मंत्री बालकिशन टुवाणी, सांस्कृतिक मंत्री दामोदर बाहेती, सहसचिव श्रीकांत बंग, सुरेन्द्र हेडा, बिपीन जाजू (करवीर ), अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्रीकांत मंत्री, भिकुलाल मर्दा, घनश्याम इनाणी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शांतिकिशोर मंत्री, वासुदेव बांगड, रामनिवास मुंदडा, कैलाशचंद धूत, मुकेश खाबाणी, रामअवतार भूतडा, श्यामसुदंर झंवर, मोहनलाल चांडक (करवीर), दिलीप बजाज (जयसिंगपुर) यांनी पदभार स्वीकारला. सूत्रसंचालन शिवप्रसाद तापडिया व श्यामसुदंर झंवर यांनी केले. आभार अशोककुमार मंत्री यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT