फोटो आहे.
....
चांदीच्या १६ विटा चोरणाऱ्या
परप्रांतीयास २४ तासांत अटक
कोल्हापूर, ता. २२ ः चांदीच्या १६ विटा लंपास करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास जुना राजवाडा पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. प्रशांतकुमार श्रीवीरेश यादव (वय २३, मूळ रा. मंगदपूर, जि. आग्रा, उत्तरप्रदेश, सध्या रा. भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. करवीर नगर वाचन मंदिर परिसरातील लक्ष्मी कुरिअर सेंटरचे कुलूप काढून शुक्रवारी (ता.२१) त्याने या विटा लंपास केल्या होत्या.
पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मी कुरिअर सेंटरमधून चोरट्याने पाच लाख ४७ हजार रुपये किंमतीच्या सात किलो ८१ ग्रॅम वजनाच्या १६ चांदीच्या विटा चोरल्या होत्या. याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चोरी कोणी केली असेल याचा अंदाज पोलिसांनी घेतला. तेंव्हा कुरिअर सेंटरची माहिती असलेल्या व्यक्तीकडूनच चोरी केली असल्याचा संशय व्यक्त झाला. उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी कुरिअर सेंटरशी संबंधित कोण आहे याची माहिती घेतली. त्यानुसार सराफ गल्लीत चांदी पॉलिशचे काम करणारा संशयित प्रशांतकुमार यादव याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडून योग्य उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने लक्ष्मी कुरिअर सर्व्हिसेस सेंटरमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील चांदीच्या विटा जप्त केल्या. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप जाधव, परशुराम गुजरे, सतीश बांबरे, प्रशांत घोलप, प्रितम मिठारी, प्रशांत पांडव, गजानन गुरव, अमर पाटील, संदीप माने, किरण वायदंडे, गौरव शिंदे, संदीप बेंद्रे, योगेश गोसावी यांच्या पथकाने कारवाई केली.
-------
..........
पटेल कॉलनीतून पाच विद्युत मीटर चोरीस
कोल्हापूरः शाहूपुरीतील एलिगंट हॉटेलच्या पाठीमागे पटेल कॉलनीतील अपार्टमेंटमधून चोरट्याने पाच विद्युत मीटर लंपास केले. सुमारे दहा हजार रुपये किंमतीची चालू स्थितीतील पाच वीज मीटर चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याची फिर्याद महावितरणचे लाईनमन परशुराम दिनकरराव भोसले यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २२ डिसेंबर २०२२ ते १४ एप्रिल २०२३ दरम्यान घडला आहे. जुने अपार्टमेंट पाडून नवीन इमारत बांधण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या अपार्टमेंटमधील रहिवाशी दुसरीकडे राहण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे तेथे कोणीही नसल्याचा फायदा घेवून ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
.....................
प्रवाशाच्या खिशातील दोन मोबाइल हॅण्डसेट चोरले
कोल्हापूरः मध्यवर्ती बसस्थानकासमोर केएमटी बस स्टॉपवर बसमध्ये बसणाऱ्या मुंबईतील प्रवाशाच्या खिशातील दोन मोबाइल हॅण्डसेट चोरट्याने लंपास केले. त्याची किंमत सुमारे वीस हजार रुपये होती. दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हरिभाऊ मारुती निर्मळे हे मूळचे अंधेरी वेस्ट, मुंबई येथील राहणारे आहेत. ते क्रांतिसिंह नाना पाटील नगरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून हे मोबाईल हॅण्डसेट लंपास केल्याची फिर्याद त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.