कोल्हापूर

राजाराम मतदान

CD

97775
कोल्हापूर ः छत्रपती राजाराम कारखान्यासाठी रविवारी होणाऱ्या मतदानासाठी शनिवारी रमण मळा येथील महसूल कल्याण निधी सभागृहातून मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाताना कर्मचारी. (नितीन जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)

राजाराम कारखान्यासाठी
आज मतदान; यंत्रणा सज्ज
---
छुप्या प्रचाराला वेग, व्हिडिओही व्हायरल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः माजी आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्यासाठी उद्या (ता. २३) मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, मतदान साहित्यासाठी कर्मचाऱ्यांना आज ५८ केंद्रांवर पाठविण्यात आले. रमण मळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात ही प्रक्रिया झाली.
दरम्यान, जाहीर प्रचाराची सांगता झाल्यावर आज पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे. कार्यक्षेत्रातील अनेक गावांत ‘अर्थ’पूर्ण प्रचाराला वेग आला असून, सोशल मीडियावरही काही गावांतील वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाले. साडेसहा तालुक्यांतील १२२ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या ‘राजाराम’च्या विद्यमान संचालकांची मुदत तीन वर्षांपूर्वीच संपली आहे. कोरोना व अन्य न्यायालयीन वादामुळे ही निवडणूक पुढे गेली होती. संस्था गटातील एक व अन्य गटातील २० अशा २१ जागांसाठी ही निवडणूक होत असून, दोन अपक्षांसह ४४ उमेदवार रिंगणात आहेत. कारखान्याच्या पोटनियमानुसार विरोधी पॅनेलचे २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीतील रंगत वाढली. दोन्ही बाजूंकडून कारखान्याच्या कारभाराबरोबरच वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे निवडणूक गाजत आहे. गेल्या निवडणुकीत विरोधी गटाबरोबर असलेल्या ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे यांनी या वेळी सत्तारूढ गटाला पाठिंबा देताना विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील वक्तव्य केले. त्यांच्या पाठबळाचे निकालात किती पडसाद उमटणार, याविषयीही उत्सुकता आहे.
या निवडणुकीसाठी ५८ मतदान केंद्रे आहेत. संस्था गटाचे मतदान शहरातील सेंट झेव्हियर्स हायस्कूलमध्ये होणार असून, या गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक सत्तारूढ गटातून रिंगणात आहेत. प्रत्येक केंद्रावर २५० मतदारांची व्यवस्था आहे. संभाव्य लढत पाहता मतदान केंद्रावर बंदी आदेश लागू करण्यात आला असून, चोख बंदोबस्तही आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, तर सहायक म्हणून प्रदीप मालगावे काम करीत आहेत.

जिल्ह्यातील ५८ मतदान केंद्रांवर एक पोलिस आणि एक होमगार्ड असेल. शीघ्र कृती दलाच्या सात तुकड्या तैनात आहेत. कसबा बावडा, शिरोली, गडमुडशिंगी, पट्टणकोडोली, कुंभोज, नरंदे, टोप, शिये, निगवे दुमाला मतदान केंद्रांवर मोठा फौजफाटा असेल. शाहूपुरी, करवीर, शिरोली एमआयडीसी, गांधीनगर, पेठवडगाव आणि हातकणंगले पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.


मतमोजणी मंगळवारी
निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. २५) सकाळी आठपासून रमण मळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या बहुउद्देशीय सभागृहात होईल. दुपारी दोनपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. मतदानासह मतमोजणीचे प्रशिक्षण आज कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

दृष्टिक्षेपात
कारखाना कार्यक्षेत्र- साडेसहा तालुक्यांतील १२२ गावे
संचालकपदाच्या जागा- २१
सभासद- १३ हजार ५३८
मतदान केंद्रे- ५८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT