कोल्हापूर

अक्षय तृतीया-अंबाबाई

CD

9786०,97862
...

श्री अंबाबाईची
झोपाळ्यावरील सालंकृत पूजा

अक्षय्य तृतीयेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी

कोल्हापूर, ता. २२ ः साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त आज श्री अंबाबाईची झोपाळ्यावरील सालंकृत पूजा बांधण्यात आली. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली. सायंकाळी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन मगच खरेदी करण्यावरही अनेकांनी भर दिला. दरम्यान, गरुड मंडपात सायंकाळी पारंपरिक उत्साहात श्री अंबाबाईचा दोलोत्सव साजरा झाला. श्रीपूजक मयुर मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर, सोहन मुनीश्वर, सचिन गोटखिंडीकर, श्रीनिवास जोशी यांनी देवीची पूजा बांधली.
अक्षय तृतीयेदिवशी अंबाबाई झोपाळ्यावर आरूढ होऊन गौरीप्रमाणे झोके घेते, या सोहळ्याला ‘दोलोत्सव’ म्हणतात. सूर्यास्तापूर्वी मंगलवाद्यांच्या गजरात उत्सवमूर्ती गरुड मंडपात आणण्यात आली. झोपाळ्यावर विराजमान झाल्यानंतर तिची सालंकृत पूजा बांधण्यात आली. सोबत चवऱ्या, मोर्चेल, अब्दागिरीही विराजमान झाल्या. विविध पाना-फुलांनी गरुड मंडप सजला आणि दोलोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर सुवासिनींकडून हळदी-कुंकवाबरोबरच कैरीचे पन्हे आणि आंबेडाळ देण्याची धांदल सुरू झाली. रात्री पुन्हा चोपदारांच्या ललकारीने उत्सवमूर्तीचे गर्भगृहाकडे प्रस्थान झाले आणि त्यानंतर शेजारती झाली.
............

ऑनलाईन दर्शन

देवस्थान समितीच्या वतीने हा सोहळा भाविकांना घरबसल्या अनुभवण्यासाठी ‘यूट्यूब''च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण झाले. मंदिरात परिसरात भाविकांना हा सोहळा अनुभवण्यासाठी टीव्हीच्या माध्यमातूनही थेट प्रक्षेपण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 मार्च 2026

Pune News: औषधोपचाराने ‘एमडीआर’ क्षयरोगावर मात; मृत्युदर घट, बरे होण्याचे प्रमाण वाढले

इनर इंजिनिअरिंग : आपल्यातील सर्वोच्च शक्ती

SCROLL FOR NEXT