कोल्हापूर

दृश्य आणि अनुभव प्रदर्शनाला प्रारंभ

CD

97867
कोल्हापूर : ‘दृश्य आणि अनुभव’ प्रदर्शनाला शनिवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवनात प्रारंभ झाला. कलाकृती पाहताना विद्यार्थीनी.

‘दृश्य आणि अनुभव’ कलाकृती प्रदर्शन सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : दीड महिन्यापूर्वी निसर्गाच्या साक्षीने झालेल्या कार्यशाळेतील कलाकृतींच्या ‘दृश्य आणि अनुभव’ प्रदर्शनाला आजपासून राजर्षी शाहू स्मारक भवनातील कलादालनात प्रारंभ झाला. शहर आणि परिसरातील काही नवोदित आणि कल्पक चित्र निर्मिती करणाऱ्या पंचवीस चित्रकारांचा त्यामध्ये समावेश आहे. चित्रकलेतील कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेतले नसतानाही त्यांनी अफलातून चित्र निर्मिती केली असून प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्यावी, अशा प्रतिक्रिया या वेळी व्यक्त झाल्या. २५ एप्रिलपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
ज्येष्ठ समीक्षक श्रीराम खाडिलकर, डॉ. अनमोल कोठाडिया, प्राचार्य अजय दळवी, चित्रकार संजय शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाला प्रारंभ झाला. चित्रकार गिरीश उगळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम झाला. सातारा येथील चित्रकार विजय धुमाळ, प्रशांत सुतार, जयसिंग चव्हाण यांचे विशेष सहकार्य मिळाले. दरम्यान, उद्या (ता. २३) पासून तीन दिवस सायंकाळी पाच ते आठ या वेळेत विविध लघुपट व माहितीपट येथे दाखवले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : 'भारतासाठी ही स्थिती चिंताजनक, युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम होणार'; PM नरेंद्र मोदी यांचा इशारा

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

SCROLL FOR NEXT