कोल्हापूर

जुना बुधवार मिरवणूक

CD

98142
कोल्हापूर : शिवजयंती निमित्ताने संयुक्त जुना बुधवारतर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
98145
कोल्हापूर : शिवजयंती निमित्त संयुक्त जुना बुधवारतर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

थरारक प्रात्यक्षिके अन् लोककलांचे सादरीकरण
शिवजयंतीनिमित्त ‘संयुक्त जुना बुधवार’तर्फे मिरवणुक; प्रबोधनाचे फलकही लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके, धनगरी ढोलचा ठेका, लोककलांचे सादरीकरण अशा जल्लोषी वातावरणात शिवजयंतीची मिरवणूक आज अविस्मरणीय ठरली. राजमाता जिजाऊ, बालशिवाजी, मावळ्यांच्या वेशभूषेतील बालचमूंनी मिरवणुकीची रंगत वाढवली. निमित्त होते संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित मिरवणुकीचे.
मालोजीराजे छत्रपती, तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष अरूण मोरे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, ॲड. महादेवराव आडगुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकचे उद्‍घाटन झाले. तोरस्कर चौकातून मिरवणुकीस सुरवात झाली. जुना बुधवारचे झेंडे घेऊन युवा कार्यकर्ते मिरवणुकीच्या अग्रभागी होते. मोठ्या आवाजाच्या ध्वनीक्षेपकावर शिवगीते लावण्यात आली होती. डोक्याला जुना बुधवारची पट्टी व हातात भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते नृत्यात दंग होते.
रिक्षावर लावलेल्या प्रबोधनात्मक फलकांनी शिवभक्तांचे लक्ष वेधले. ‘कोल्हापूरचा विकास करतो म्हणून कोण आलंय का बिंदू चौकात? विकासाच्या राजकारणाला विसरलेले नेते...गटाच्या राजकारणाला कंटाळलेलं कोल्हापूर..!,’ ‘अतिमोबाईल एक समस्या, मोबाईलमुळे उद्धवस्त घर संसार,’ ‘स्टेडियमला नाव छत्रपती शाहूंचे...पण स्टेडियमची अवस्था माव्याची खाण..बाटल्यांची घाण..वादाचं स्थान...!,’ ‘कोल्हापूर नशेच्या विळख्यात..!, कोल्हापूरचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्‍न सोडवले जातील, ही अपेक्षा ठेवू नये. ‘हिंदवी स्वराज्याचे शिलेदार,’ हे फलक वैशिष्ट्यपूर्ण ठरले. धनगरी ढोलच्या ठेक्यावर अब्दागिऱ्या गरगर फिरवत धनगर बांधव जुना बुधवार तालमीच्या इमारतीपासून पुढे सरकत होते. मागोमाग माद्याळ (ता. कागल) येथील श्रीराम लेझीम मंडळातील कलाकारांनी लेझीमचे लयदार प्रात्यक्षिक सादर केले. हलगीच्या ठेक्यावरील त्यांची प्रात्यक्षिकांना शिवभक्तांनी दाद दिली. सोन्या मारूती चौक, महापालिका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, खासबाग मैदान ते मिरजकर तिकटी येथे मिरवणूक आल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. सायंकाळी साडेसातनंतर बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. रोषणाईच्या झगमगाटात मार्ग उजळून गेल्याने मिरवणुकीची रंगत वाढत गेली. कुंभार गल्लीतून पुढे जुना बुधवार तालमीकडे मिरवणूक गेल्यानंतर तिची सांगता झाली.
नागेश घोरपडे, दिगंबर फराकटे, सुशील भांदिगरे, अनिकेत पाटील, अनिल निकम, उदय भोसले, पिंटू स्वामी, रमेश गवळी, संदीप राणे, संजय पाटील, अनिल पाटील, सुशांत महाडिक, महेश शिंदे, समर्थ रेडेकर, अक्षय घाटगे, पृथ्वीराज चव्हाण यांनी संयोजन केले.
----------------
चौकट
मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके
पेठेच्या मर्दानी आखाड्यातील मुला-मुलींनी लाठी, पट्टा, फरी गदका, लिंबू काढणीची प्रात्यक्षिके सादर केले. प्रशिक्षक योगेश पाटील, महेश पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राकेश मेस्त्री, नारायणी कांबळे, शब्दाली चौगले, त्रिशला चव्हाण, सई पाटील, समृद्धी पाटील, दिशा जिरगे, राजकुवर चव्हाण, प्रणाली साळोखे, सुमीत चव्हाण, रोहित बोंगाळे यांनी प्रात्यक्षिके सादर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT