कोल्हापूर

आजरा ः श्रमुदकडून निषेध

CD

बारसू प्रकल्पविरोधी आंदोलकांच्या अटकेचा निषेध
आजराः बारसु रिफायनरी प्रकल्पाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना व नेत्यांना अटक करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकार आणि प्रशासनाचा तीव्र निषेध करत आहोत. श्रमिक मुक्ती दलाने याबाबतचे पत्रक प्रसिध्दी दिले आहे. पत्रकात म्हंटले आहे, ‘कोणताही प्रकल्प होताना बऱ्यावाईट परिणामांची चर्चा करणे आवश्यक असते. तसे न करता रिफायनरीचा प्रकल्प बारसूत शेतकऱ्यांवर लादण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न चालू आहे. कोकणाला उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाचा इतका आग्रह का; असा आमचा सवाल आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन पोलिस बळाचा वापर करून मोडून काढण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला स्थानिक जनता नव्हे तर महाराष्ट्रातील कष्टकरी जनता तीव्र विरोध करेल. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधिशी चर्चा करून या प्रकल्पच्या बऱ्यावाईट परिणामांची शास्त्रीय पायावर तपासणी झाल्यानंतर चर्चा करूनच प्रकल्पाचा निर्णय झाला पाहिजे. तत्पूर्वी चालू असलेले सर्व्हेक्षण तातडीने थांबवून आंदोलकांची सुटका करावी. याबाबत निर्णय न झाल्यास श्रमिक मुक्ती दल रिफायनरीविरोधी लढ्यात सक्रिय सहभाग घेईल. पत्रकावर श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई , नारायण भडांगे, दशरथ घुरे व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT