कोल्हापूर

खंजीरे यांचा जन्मशताब्दी महोत्सव महिनाभर

CD

98982

खंजीरे यांचा जन्मशताब्दी महोत्सव महिनाभर
राहूल खंजीरे यांची माहिती; शनिवारपासून विविध उपक्रम राबवणार

इचलकरंजी, ता. २७ ः येथील थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांचा जन्म शताब्दी महोत्सव सोहळा २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. सलग महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांसह सामाजिक, सांस्कृतीक उपक्रम घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती जन्म शताब्दी समितीचे कार्याध्यक्ष राहुल खंजीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांनी अमू्ल्य योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांनी सहकार आणि राजकीय क्षेत्राचे नेतृत्व केले. त्यांनी तीन वेळा इचलकरंजी विधान सभा मतदार संघाचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, या हेतूने त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खंजीरे यांनी सांगीतले.
यानिमित्त जन्म शताब्दी समिती स्थापन केली आहे. माजी खासदार जयवंतराव आवळे यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. राहूल खंजीरे हे कार्याध्यक्ष तर अशोक स्वामी उपाध्यक्ष, मदन कारंडे स्वागताध्यक्ष, शशांक बावचकर कार्यवाह व शामराव कुलकर्णी समिती सदस्य आहेत. या समितीच्या नेतृत्वाखाली येत्या महिनाभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये विविध क्रिडा स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रम होणार आहेत. या शिवाय स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. तर विविध मान्यवरांच्या उपस्थीतीत सांगता समारंभ होणार असल्याचे कार्याध्यक्ष खंजीरे यांनी सांगीतले. प्रकाश सातपूते, सदा मलाबादे, सयाजी चव्हाण, इस्माईल समडोळे, शामराव कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, प्रमोद खुडे आदी उपस्थीत होते.
----------
राष्ट्रीय स्पर्धेने सुरुवात
येथील जयहिंद मंडळाच्या क्रिडांगणावर सकाळी दहा वाजता `एल्बो बॉक्सींग` या राष्ट्रीय स्पर्धेने जन्मशताब्दी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच अशी स्पर्धा होणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन होणार आहे. याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT